दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने उघड केलं 'पठाण' चित्रपटातील शाहरुख खानच्या लूकमागचं गुपित; म्हणाला... | Director siddharth aanand revealed secret behind shahrukh khans look in pathaan | Loksatta

दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने उघड केलं ‘पठाण’ चित्रपटातील शाहरुख खानच्या लूकमागचं गुपित; म्हणाला…

शाहरुख खान ‘पठाण’ चित्रपटातून चार वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने उघड केलं ‘पठाण’ चित्रपटातील शाहरुख खानच्या लूकमागचं गुपित; म्हणाला…

शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट त्याच्या घोषणेपासूनच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याने त्याचे चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. या चित्रपटातील त्याचा लूक काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. तो लूक सर्वांच्याच पसंतीस पडला. तर आता या चित्रपटाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद याने शाहरुखचा लूक असाच का ठेवला यामागचं कारण उघड केलं आहे.

सिद्धार्थने नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत सिद्धार्थ म्हणाला, “पठाणसाठी शाहरुखचा लूक तयार करणं आमच्याक्साठी खूप आव्हानात्मक होतं. शाहरुख खानने आतापर्यंत आपल्या देशातील पॉप संस्कृती दर्शवणारे अनेक लूक दिले आहेत आणि त्याचे ते सगळे लूक प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. आता पठाणमध्ये तो एका धाडसी गुप्तहेराची भूमिका साकारतोय त्यामुळे त्याप्रमाणे आम्हाला त्याचा लूक डिझाईन करायचा होता.

आणखी वाचा : “माझं लग्न अयशस्वी…”; फराह खानने दिल्या जुन्या आठवणींना उजाळा

तो पुढे म्हणाला की, “आम्हाला असा लूक हवा होता जो त्याच्या व्यक्तिरेखेला पूर्णपणे बसेल. आम्हाला शाहरुखला त्याच्या लूकद्वारे एकाच वेळी कूल आणि हॉट दाखवायचं होतं. आमच्या चाहत्यांनी त्याच्या लूकला दिलेल्या प्रतिसादाचा विचार करता, आम्ही अभिमानाने म्हणू शकतो की आम्ही यशस्वी झालो आहोत.”

हेही वाचा : Photos: शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बांगल्याचा लूक बदलला, घराला लागली नवी ‘डायमंड नेमप्लेट’

शाहरुख खान ‘पठाण’ चित्रपटातून चार वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. त्यामुळेच चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. किंग खानशिवाय या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 10:00 IST
Next Story
मुलगी अभिनेत्री अन् मुलगा बनणार लेखक; शाहरुख खानचा लेक आर्यन खान पदार्पणासाठी सज्ज