director vikram bhatt daughter krishna get engaged with vedant sarda photos viral | Loksatta

आमिर खानच्या मुलीनंतर बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या लेकीने गुपचूप उरकला साखरपुडा, फोटो व्हायरल

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलीच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल

आमिर खानच्या मुलीनंतर बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या लेकीने गुपचूप उरकला साखरपुडा, फोटो व्हायरल
विक्रम भट्ट यांच्या मुलीच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल. (फोटो: विक्रम भट्ट/ इन्स्टाग्राम)

मनोरंजन विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. मराठी कलाविश्वातप्रमाणेच बॉलिवूडमधील जोडप्यांचीही लगीनघाई सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा हिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसह साखरपुडा पार पडला. त्यानंतर आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलीने गुपचूप साखरपुडा उरकला आहे.

बॉलिवूड निर्माता, दिग्दर्शक विक्रम भट्ट यांची मुलगी कृष्णा भट्ट व वेदांत सरदा यांचा साखरपुडा पार पडला आहे. विक्रम भट्ट यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन मुलीच्या साखरपुडा सोहळ्यातील खास क्षणांचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा>> “मी त्याची…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारासाठी श्रेया बुगडेची खास पोस्ट

हेही वाचा>>Video: पारंपरिक थाट, शाही सोहळा अन् समुद्रकिनारा; अभिनेत्याचा वेडिंग व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय

कृष्णा व वेदांत यांनी साखरपुड्यासाठी पिवळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये खास लूक केला होता. कृष्णाचं सौंदर्य खुलून आलेलं फोटोमध्ये दिसत आहे. त्या दोघांचेही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

हेही पाहा>> Photos: अपूर्वा नेमळेकर की राखी सावंत? कोण मारणार बाजी? पाहा ‘बिग बॉस मराठी’तील टॉप १० स्पर्धकांची यादी

विक्रम भट्ट बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांनी ‘राज’, ‘मदहोश’, ‘कसूर’, ‘फुटपाथ’ असे अनेक सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 18:18 IST
Next Story
‘कयामत से कयामत तक’साठी आमिर खानला मिळालं होतं एवढं मानधन