टीव्ही अभिनेत्री दिव्या अग्रवाल लग्नबंधनात अडकली आहे. तिने मंगळवारी बॉयफ्रेंड अपूर्व पाडगावकरशी मराठी पद्धतीने लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर लोक या जोडप्याला शुभेच्छा देत आहेत.

दिव्याने थाटामाटात नाही तर घरीच अत्यंत साधेपणाने लग्न केलं. दिव्या नेहमीच लाइमलाइटमध्ये असते, पण तिचा पती अपूर्व या झगमगत्या दुनियेपासून थोडा दूर राहतो. दिव्याच्या पतीचा मनोरंजन जगताशी संबंध नाही हे सर्वांनाच माहीत आहे. मग दिव्याचा पती काय करतो? चला जाणून घेऊयात.

Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Child beaten teacher pune, pune,
पुणे : शिक्षिकेकडून मुलाला बेदम मारहाण; समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”

अपूर्व पाडगावकर काय करतो?

दिव्या अग्रवालचा पती अपूर्व उद्योजक आहे. तो बिझनेसमन असण्यासोबतच इंजिनिअरदेखील आहे. त्याने एमबीएही केलं आहे. त्याची मुंबईत चार रेस्टॉरंट आहेत. वाशीतील ‘द टाइट पब’ आणि ‘सोया स्ट्रीट’, वांद्र्यात ‘लेमन लीफ’ व ‘येलो टँग’ रेस्टॉरंट्सचा तो मालक आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर ५६ हजार फॉलोअर्स आहेत. त्याला कुत्र्यांची खूप आवड आहे. तो महिलांसाठी मास्टर क्लास चालवतो. ज्यामध्ये तो स्वयंपाक करण्यापासून पेंटिंगपर्यंतच्या विविध गोष्टी शिकवतो.

‘बिग बॉस’ फेम दिव्या अग्रवाल होणार मराठमोळ्या उद्योजकाची बायको; तिचा होणारा नवरा काय काम करतो? जाणून घ्या…

दिव्या अग्रवालबद्दल माहिती

दिव्याचा जन्म १९९२ साली नवी मुंबईत झाला. तिला प्रिन्स अग्रवाल नावाचा एक भाऊही आहे. तिने तिचे शालेय शिक्षण सेंट झेवियर्स हायस्कूलमधून पूर्ण केले. दिव्याने पत्रकारितेत पदव्यूत्तर पदवी पूर्ण केली आहे. ती सानपाडा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड टेक्नॉलॉजी, कॅनेडियन युनिव्हर्सिटी, दुबईची माजी विद्यार्थिनी आहे. दिव्या एक डान्सर देखील आहे आणि ती टेरेन्स लुईस डान्स अकॅडमीमधून डान्स शिकली होती.

‘बिग बॉस’ फेम दिव्या अग्रवालने चेंबूरमध्ये राहत्या घरी मराठमोळ्या बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ! फोटो शेअर करत म्हणाली…

दिव्याची स्वतःची डान्स अकादमी

दिव्याने ‘एलिव्हेट डान्स इन्स्टिट्यूट’ नावाने स्वतःची डान्स अकादमीही उघडली आहे. तिने इलियाना डिक्रूझ आणि शिल्पा शेट्टीसारख्या अभिनेत्रींसाठी कोरिओग्राफीही केली आहे. रिपोर्टनुसार, दिव्या अग्रवालची एकूण संपत्ती ७ ते १० कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. दिव्या सर्वाधिक मानधन घेतलेल्या भारतीय मॉडेल्सपैकी एक आहे. तिला एका प्रोजेक्टसाठी १० ते १५ लाख रुपये मिळतात.