Katrina Kaif Baby Boy Health Update: कतरिना कैफ व विकी कौशल आई-बाबा झाले आहेत. या जोडप्याने लग्नानंतर ४ वर्षांनी ७ नोव्हेंबर रोजी आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं. कतरिनाने मुलाला जन्म दिला. कौशल कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. कतरिना अजूनही रुग्णालयात आहे. कतरिना व बाळाची प्रकृती कशी आहे, याबद्दल डॉक्टरांनी माहिती दिली आहे.
विकी कौशलने मुलाच्या जन्माची बातमी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून दिली. त्यानंतर चाहत्यांना कतरिना आणि तिच्या बाळाच्या प्रकृतीबद्दल जाणून घ्यायंच होतं. रुग्णालय प्रशासनाने माहिती दिली की ते दोघांचीही प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे.
डॉक्टरांनी काय सांगितलं?
कतरिना कैफने मुंबईतील एच.एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये सकाळी ८:२३ वाजता मुलाला जन्म दिला. त्यानंतर, रुग्णालय प्रशासनाने कतरिनाची हेल्थ अपडेट जारी केली आहे. “अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांना मुलगा झाला. आई आणि बाळ दोघेही निरोगी आहेत. डिस्चार्जची तारीख अद्याप ठरलेली नाही,” असं म्हटलं आहे.
विकी व कतरिनावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्रियांका चोप्रा, परिणीती चोप्रा, करीना कपूर खान, कियारा अडवाणी, माधुरी दीक्षित, आयुष्मान खुराना, राजकुमार रावसह अनेक सेलिब्रिटींनी दोघांचं अभिनंदन केलं आहे. तर चाहत्यांनी तर विकी व कतरिनाच्या पोस्टवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
कतरिना कैफ आणि विकी कौशल हे बॉलीवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय जोडपं आहे. २०२० मध्ये ते डेटिंग करू लागले. एक वर्ष डेटिंग केल्यानंतर, त्यांनी डिसेंबर २०२१ मध्ये राजस्थानमध्ये एका शाही समारंभात लग्न केले. त्यांनी लग्नाची बातमी पूर्णपणे खासगी ठेवली होती. त्यांच्या लग्नाला फक्त कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते.
आता लग्नाच्या चार वर्षांनंतर, २०२५ मध्ये या जोडप्याने त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे. कतरिना अजूनही रुग्णालयात आहे. तिला डिस्चार्ज कधी दिला जाईल, हे अद्याप अस्पष्ट आहे.
