बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने गेल्या काही वर्षातच बॉलिवूडमध्ये निर्माण केले आहे. नुकताच तिचा डबल एक्सएल हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिच्यावर हुमा कुरेशीदेखील आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्या अनेक ठिकाणी गेल्या होत्या. बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत तिने करियर, चित्रपटातबद्दल खुलासे केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॉलिवूड बबलमध्ये तिला सलमान खानबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ती म्हणाली “मला अनेकांनी सांगितलं होत सलमान खानच्या चित्रपटातून करियरची सुरवात करशील तर फ्लॉप अभिनेत्री होशील. एखाद्या अभिनेत्रीबरोबर हे घडणं अत्यंत वाईट गोष्ट आहे. मी त्यावेळी अशा गोष्टींकडे लक्ष दिले नाही मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित केले. तोच एक माझ्यापुढे पर्याय होता. सोनाक्षीने दबंग चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटात ती सलमान खानबरोबर झळकली होती.

“कांतारा आमच्यासाठी…”; दाक्षिणात्य चित्रपटांबद्दल बोलताना वरुण धवनने दिली प्रतिक्रिया

सोनाक्षी २०२१ मध्ये तिचा ‘भुज: द प्राईड ऑफ इंडिया’ या चित्रपट दिसली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मागील तीन-चार वर्षांमध्ये सोनाक्षीचे बरेचसे चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल झाले. पण त्यातल्या फार कमी चित्रपटांना लोकांची पसंती मिळाली.

सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेश या चित्रपटातून लठ्ठ महिलांची कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आल्या आहेत. प्रेक्षकांचादेखील या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्रींच्या बरोबरीने चित्रपटात शिखर धवनही दिसला आहे. शिखर या चित्रपटात खास भूमिका आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Double xl actres sonakshi sinha was told whoever debuted alongside salman khan didnt have a long career spg
First published on: 05-11-2022 at 11:12 IST