Drishyam 3 actors fees: ‘दृश्यम ३: द कन्क्लुजन’ हा सिनेमा २ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमधून उत्तम कमाई करण्यास सुरुवात केली आहे. आता या सिनेमातील कलाकारांनी या सिनेमासाठी नेमकं किती मानधन घेतलं आहे, याबद्दल जाणून घेऊ…

‘दृश्यम ३’मध्ये अजय देवगणने किती घेतले मानधन?

न्यूज एक्सच्या रिपोर्टनुसार ‘दृश्यम ३ : द कन्क्लुजन’मध्ये अजय देवगणला १८ ते २२ कोटी रुपये मानधन देण्यात आले आहे; तर तब्बूला २.५ कोटी ते ३.५ कोटींदरम्यान मानधन मिळाले आहे. अजय देवगणने या सिनेमात विजय साळगावकर ही भूमिका साकारली आहे; तर तब्बू मीरा देशमुख या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

श्रिया सरनने किती मानधन घेतले?

‘दृश्यम ३’मध्ये अभिनेत्री श्रिया सरन पुन्हा एकदा विजय साळगावकरची पत्नी नंदिनी साळगावकर या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी तिने एक कोटी घेतल्याचे म्हटले जात आहे. विजय आणि नंदिनीची मोठी मुलगी अंजूची भूमिका साकारणाऱ्या इशिता दत्ताला ५० लाख मिळाले आहेत. तर, मीराचा नवरा महेश देशमुखची भूमिका साकारणाऱ्या रजत कपूरला ४० ते ७० लाख रुपये मानधन मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

रिपोर्टसनुसार कलाकारांच्या मानधनाचे आकडे समोर आले असले तरी कलाकार किंवा निर्मात्यांनी याबद्दल अधिकृतपणे माहिती दिलेली नाही.

‘दृश्यम: द कन्क्लुजन’ कधी प्रदर्शित होणार?

अभिषेक पाठक दिग्दर्शित ‘दृश्यम: द कन्क्लुजन’ २ ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. याआधी ‘दृश्यम’ व ‘दृश्यम २’ या दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे प्रेक्षक ‘दृश्यम ३’ बघण्यासाठी उत्सुक आहेत.

आता ‘दृश्यम ३: द कन्क्लुजन’च्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमधून कोट्यवधींची कमाई केली आहे. दरम्यान, सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमाला कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.