श्रीया सरन भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या सौंदर्य, दमदार स्क्रीन प्रेझेन्स आणि अभिनयामुळे तिने देशभरात मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. बॉलीवूडपासून दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीपर्यंत तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.सध्या ती अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’मुळे चर्चेत आहे. यामधून ती शेवटचं एकदा अजय देवगणच्या ऑनस्क्रीन पत्नीच्या म्हणजेच नंदिनी साळगावकरच्या भूमिकेतून झळकत आहे.

‘दृश्यम ३’मुळे चर्चेत असलेल्या श्रीया सरणबद्दलच्या अनेक गोष्टी तिच्या चाहत्यांना माहीत नाही. महत्त्वाचं म्हणजे ती मनोरंजनविश्वातील श्रीमंत कलाकारांपैकी एस असून तिच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे.सध्या ‘दृश्यम ३’मुळे चर्चेत असलेल्या श्रीयाबद्दल, तिच्या संपत्तीबद्दल आणि अभिनयप्रवासाबद्दल जाणून घेऊयात.

१९८२ मध्ये जन्मलेल्या श्रीया सरनने २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या तेलुगू ‘इष्टम’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर ‘संतोषम’, रजनीकांत यांच्याबरोबर ‘शिवाजी: द बॉस’, अजय देवगणबरोबरचा ‘दृश्यम’ आणि एस. एस. राजामौली यांच्या ‘आर.आर.आर’मधील भूमिकांमुळे ती लोकप्रिय झाली. अभिनयाबरोबर श्रीया प्रशिक्षित कथ्थक नृत्यांगनाही आहे. जगभरातील अनेक प्रतिष्ठित मंचांवर तिने कथ्थक सादर केलं आहे.

श्रीया सरन एका चित्रपटासाठी किती मानधन घेते?

DNA Indiaच्या वृत्तानुसार, २०२४ मध्ये श्रीया दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक असल्याचं सांगितलं जात होतं. ती एका चित्रपटासाठी जवळपास ३ ते ४ कोटी रुपये मानधन घेत असल्याचं वृत्त आहे. तिची लोकप्रियता, यशस्वी चित्रपट आणि जाहिरातींमधून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या आधारे तिची एकूण संपत्ती सुमारे ८० कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.

श्रीया सरनचं मुंबईतील आलिशान घर

श्रीया सरन पती, रशियन टेनिसपटू आणि उद्योजक आंद्रेई कोश्चीव आणि मुलगी राधाबरोबर मुंबईतील सुंदर डिझाइन केलेल्या अपार्टमेंटमध्ये राहते. त्यांच्या घराच्या इंटिरिअरमध्ये भारतीय संस्कृती आणि अध्यात्माची झलक पाहायला मिळते. आधुनिक शैलीसोबत पारंपरिक सजावटीचा सुरेख मिलाफ या घराच्या इंटिरिअरमध्ये करण्यात आला आहे.असंही वृत्त आहे.

श्रीया सरनचं आलिशान कार कलेक्शन

श्रीया सरनच्या कार कलेक्शनमध्ये अनेक महागड्या गाड्यांचा समावेश असल्याचं सांगितलं जातं. यामध्ये ६५ लाख रुपयांची ऑडी A6, १ कोटी रुपयांची मर्सिडीज बेंझ GLE, १२ लाख रुपयांची Ford EcoSport आणि १.७ कोटी रुपयांची BMW 7 Series या गाड्यांचा समावेश आहे. तिचं हे कार कलेक्शन महागड्या आणि प्रीमियम गाड्यांबद्दलची तिची पसंती दर्शवतं.

दरम्यान, ‘दृश्यम ३’सध्या चांगली कमाई करत आहे. २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने पहिल्या दिवशी कोट्यवधींची कमाई केली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी ५६.०४ कोटी रूपयांचं कलेक्शन केलं आहे.