अजय देवगणचा ‘दृश्यम २’ हा चांगलाच सुपरहीट ठरला. चित्रपटाने आत्तापर्यंत १९० कोटीचा आकडा पार केला आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाचा उदंड प्रतिसाद दिला आहे. केवळ मुख्य कलाकारच नव्हे तर सहाय्यक कलाकारांची कामंदेखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. यापैकी चित्रपटातील एक असं पात्र ज्याला पाहून लोकांच्या तळपायाची आग मस्तकात जाते ते म्हणजे पोलिस अधिकारी गायतोंडेचं.

हे पात्र साकारलंय मराठी अभिनेता कमलेश सावंत यांनी. कमलेश यांनी त्यांचं काम अत्यंत चोख केलं आहे त्यामुळेच आज प्रेक्षक या पात्रावर एवढे भडकलेले आपल्याला दिसत आहेत. पहिल्या भागातही कमलेश यांचं काम खूप पसंत केलं गेलं. पहिल्या भागातही त्यांचं काम बघून प्रेक्षकांनी दात ओठ खाल्ले होते. याच पात्राबद्दल आणि त्यांनंतर आलेले अनुभवांबद्दल कमलेश सावंत यांनी खुलासा केला आहे. याबरोबरच चित्रपटात मिळणाऱ्या सहाय्यक भूमिका आणि मुख्य नायकाच्या भूमिकांबद्दलही कमलेश यांनी त्यांचं मत मांडलं आहे.

aamir-khan2
ठरलं! ‘या’ चित्रपटातून आमिर खान करणार दमदार कमबॅक; प्रदर्शनाबद्दल मिस्टर परफेक्शनिस्टचा खुलासा
film director Kumar Shahani passed away
प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक कुमार शाहनी यांचे निधन; कलात्मक हिंदी चित्रपटसृष्टीचा महत्त्वाचा दुवा निखळला
kattappa
‘बाहुबली’मधील कटप्पाच्या भूमिकेसाठी ‘हा’ बॉलिवूड अभिनेता होता पहिली पसंती, पण…; नेमका किस्सा जाणून घ्या
udaan fame actress kavita chaudhary biography
व्यक्तिवेध: कविता चौधरी

आणखी वाचा : ‘दृश्यम’मधील गायतोंडेला धमक्यांचे, शिवीगाळ करणारे फोन कॉल्स; कमलेश सावंत यांनी सांगितला अनुभव

‘बॉलिवूड हंगामा’ला मुलाखत देताना कमलेश यांना चित्रपटातील मुख्य नायकाची भूमिका करण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्याविषयी बोलताना कमलेश म्हणाले, “मला एकदा दिल्लीतील एका कार्यक्रमात निवेदनासाठी विचारण्यात आलं होतं, मी त्याक्षणी त्यांना नकार कळवला कारण निवेदकाचा चेहेरा सुंदरच हवा, मी कुठल्याच अॅंगलने निवेदक वाटत नाही. मुख्य भूमिकांच्या किंवा हिरोच्या भूमिकांच्या बाबतीतही अगदी हेच लागू होतं. जेव्हा कुणी मला मुख्य नायकाची भूमिका देतं तेव्हा मी म्हणतो, तुम्हाला वेड तरी नाही ना लागलं? हीरोसाठी ज्या गोष्टी हव्यात त्या माझ्यात नाही. त्यापेक्षा मुख्य चरित्र अभिनेता म्हणून काम करणं मी पसंत करेन. माझ्या गुरूंनी मला सांगितलं आहे, या इंडस्ट्रीत स्ट्रगल करताना आरसा कायम जवळ ठेवायचा, त्यामुळे मला कोणत्या भूमिका जास्त शोभून दिसतात याचा मला अंदाज येतो.”

कमलेश यांनी ‘खाकी’, ‘मुंबई मेरी जान’, ‘दीवार’, ‘फोर्स’सारख्या चित्रपटातून काम केलं आहे. ‘दृश्यम २’सुद्धा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. २०० कोटीकडे या चित्रपटाची घोडदौड सुरू आहे. इतकंच नव्हे तर दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी याच्या तिसऱ्या भागाचीसुद्धा शक्यता वर्तवली आहे.