विकी कौशल आणि सारा अली खान यांचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट २ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिल्याच वीकेंडला या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून चित्रपटाने तीन दिवसांत २२ कोटींहून अधिक कमाई केली आहे. ‘जरा हटके जरा बचके’मध्ये इंदूरमधील मध्यमवर्गीय कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात आली असून हा चित्रपट सामाजिक समस्येवर बेतलेला आहे. आता या चित्रपटाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी लाखो तिकिटे मोफत वाटली आहेत.
हेही वाचा- विकी कौशलच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे बदलले पंजाबी गायकाचे आयुष्य, रातोरात झाला स्टार




मिळालेल्या माहितीनुसार, ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी तब्बल अडीच लाख तिकिटे मोफत वाटली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्यावेळी निर्मात्यांनी एका तिकिटावर एक तिकिट मोफत अशी ऑफर दिली होती. या ऑफरमुळे निर्मात्यांना जवळपास अडीच लाख तिकिट मोफत वाटावी लागली. एका तिकिटाची किंमत २५० रुपये होती. अडीच लाख तिकिटांची रक्कम जवळपास ६.२५ कोटी रुपयांपर्यंत जाते. टॅक्स काढून टाकल्यानंतर या तिकिटांची किंमत साडे पाच कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. ही रक्कम आता प्रोडक्शन कंपनीला द्यावी लागणार आहे.
विकी कौशल आणि सारा अली खान यांचा ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपट शुक्रवारी २ जून रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी पाच कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.