scorecardresearch

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई भेटीमुळे अक्षय कुमारच्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा रद्द; ‘हे’ आहे कारण

अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मीचे चाहते या चित्रपटासाठी चांगलेच उत्सुक आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई भेटीमुळे अक्षय कुमारच्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा रद्द; ‘हे’ आहे कारण
फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत विविध विकासकामांचे उदघाटन होत आहे. या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. मोदींची मुंबई भेट असल्याने साहजिकच मुंबईतल्या वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत, याचा फटका सामान्य नागरिकांना बसला आहे. दुसरीकडे मुंबईत बॉलिवूडचे अनेक कार्यक्रम होत असतात, अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पुढे ढकलला आहे.

अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मी यांच्या ‘सेल्फी’ या चित्रपटाची चर्चा गेल्या वर्षापासून आहे. मध्यंतरी याचं एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. हे पोस्टर प्रेक्षकांना चांगलंच पसंत पडलं होतं. त्यानंतर याचा एक छोटा टीझरसुद्धा आपल्याला पाहायला मिळाला होता. याच चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मुंबईत पार पडणार होता मात्र मोदींच्या मुंबई भेटीमुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. पंतप्रधानाच्या सुरक्षेच्या कारणास्तव चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा निर्णय घेतला. २२ जानेवारी रोजी हा सोहळा होईल अशी माहिती बॉलिवूड हंगामाला मिळाली आहे.

Video : सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या ‘घोडे पे सवार’ गाण्यावर माधुरी दीक्षितच्या दिलखेच अदा, नेटकरी म्हणाले, “अनुष्कापेक्षा…”

‘सेल्फी’ २४ फेब्रुवारी या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. इम्रान हाश्मी आणि अक्षय कुमार ही कधीही न पाहिलेली जोडी या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट एक सुपरस्टार आणि त्याचा एक सुपरफॅन या दोघांवर बेतलेली असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हा एक कॉमेडी अॅक्शन थ्रिलर चित्रपट असणार आहे. याची निर्मिती करण जोहर आणि दाक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन या दोघांनी मिळून केलेली आहे. शिवाय राज मेहता यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे. लवकरच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मीचे चाहते या चित्रपटासाठी चांगलेच उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-01-2023 at 18:47 IST

संबंधित बातम्या