टीव्ही विश्वातील एकता कपूर हे मोठं नाव आहे. गेली अनेक वर्षं एकता कपूर मालिका विश्वात कार्यरत आहे. मालिकांमधील यशानंतर तिने चित्रपटांची निर्मिती केली. आज ७ जून एकता कपूरचा वाढदिवस आहे. वयाची ४५ वर्षं उलटली तरी एकता आजही अविवाहित आहे. काही जण एकताच्या लग्न न करण्यामागे तिचे वडील जितेंद्र यांची अट असल्याचे सांगतात. तर काहींच्या मते एकता आजही खऱ्या प्रेमाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, एकताच्या लग्न न करण्यामागे नक्की कारण काय आहे?
काही वर्षांपूर्वी एकताला एका मुलाखतीत लग्न न करण्यामागचे कारण विचारले होते. तेव्हा एकता सलमान खानचा उल्लेख करत म्हणाली होती, “जेव्हा सलमान खान लग्न करेल त्याच्या दोन-तीन वर्षांमध्ये मी लग्न करेन!” मात्र, अद्याप ना सलमान खानने लग्न केलं आणि ना एकताने.




जेव्हा जेव्हा एकताच्या लग्नाचा उल्लेख केला जातो तेव्हा तेव्हा तिच्या वडिलांच्या एका अटीचा उल्लेख केला जातो. या अटीमुळे एकता कपूर आजपर्यंत अविवाहित असल्याचेही मानले जात आहे. या गोष्टीचा उल्लेख एकता कपूरने एका मुलाखतीतही केला होता. एकता म्हणाली होती, ‘पप्पा म्हणाले होते की एक तर तू लग्न कर किंवा काम कर. त्यानंतर मी फक्त काम करणे निवडले. मी माझ्या अनेक मित्रांचे लग्न आणि घटस्फोट पाहिले आहेत. कदाचित याच कारणामुळे मी आत्तापर्यंत अविवाहित आहे. एकता कपूरने सरोगसीच्या मदतीने सिंगल मदर होण्याचा निर्णय घेतला होता आणि २०१९ मध्ये एकता कपूर सरोगसीद्वारे आई बनली आणि तिने आपल्या मुलाचे नाव रवी कपूर ठेवले.
हेही वाचा- “लग्न कधी करणार?” चाहत्याच्या प्रश्नावर प्रभासने सोडलं मौन, विवाहस्थळाचा खुलासा करत म्हणाला…
एकता कपूरनेही एकदा तिच्या क्रशचा उल्लेख केला होता. सोशल मीडियावर एका अभिनेत्याचा फोटो शेअर करत तिने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. हा स्टार दुसरा कोणी नसून चंकी पांडे होता. खरं तर, एकताने एकदा चंकी पांडेच्या वाढदिवसानिमित्त एक फोटो शेअर केला होता. तसेच तिने लिहिले की, “काही वर्षांपूर्वी चंकी पांडेवर माझे प्रेम होते. जर त्याने होकार दिला असता तर मी आज त्याची पत्नी असते.” याशिवाय एकताचे नाव करण जोहरसोबतही अनेकदा जोडले गेले. एका मुलाखतीत करण जोहर म्हणाला होता की, “जर मला आणि एकताला कोणीही सापडले नाही तर आम्ही एकमेकांशी लग्न करू. मात्र, एकताने या नात्यावर कधीही भाष्य केले नाही.”