Awarapan 2 Box Office Collection: सध्या थिएटरमध्ये अनेक सिनेमे प्रदर्शित होत आहेत. लवकरच ‘टॉक्सिक’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या सगळ्यात आणखी एक सिनेमा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘आवारापन २’ असे या सिनेमाचे नाव आहे.

‘आवारापन २’ हा सिनेमा १४ ऑगस्टला प्रदर्शित झाला आहे. पहिल्या दिवसापासूनच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आता ‘आवारापन २’चा पहिल्याच आठवड्यात सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप १० चित्रपटांच्या यादीत समावेश झाला आहे.

इमरान हाश्मीच्या सिनेमाने किती कोटींची केली कमाई?

इमरान हाश्मीची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाने पहिल्याच दिवशी २२ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी सिनेमाने ३२ कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी सिनेमाने २६ कोटींची कमाई केली आहे. सिनेमाची भारतातील निव्वळ कमाई ८१.७५ कोटींची आहे, तर त्याने एकूण ९८.१० कोटींची कमाई केली आहे. जगभरात सिनेमाने ११०.१० कोटींची कमाई केली आहे.

२०२६ मध्ये प्रदर्शित झालेल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत पहिल्या स्थानावर ‘धुरंधर’ हा सिनेमा आहे. ‘धुरंधर’ने पहिल्या आठवड्यात ४६६ कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या स्थानावर ‘बॉर्डर २’ हा सिनेमा आहे. या सिनेमाने १२९ कोटींची कमाई केली होती. ‘धमाल ४’ या सिनेमाने ६७.२१ कोटींची कमाई केली होती; तर ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमाने ६५.८३ कोटींची कमाई केली होती. याबरोबरच, या यादीत ‘भूत बंगला’, ‘कॉकटेल २’, ‘ओ रोमियो’, ‘अल्फा’, ‘है जवानी तो इश्क होना है’ या सिनेमांचादेखील समावेश आहे.

आता आगामी काळात ‘आवारापन २’ हा सिनेमा किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबरोबरच, ‘टॉक्सिक’ हा सिनेमा २६ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे, त्यामुळे आगामी काळात ‘आवारापन २’ला टॉक्सिकबरोबर स्पर्धा करावी लागणार आहे.

दरम्यान, ‘आवारापन २’ या सिनेमात इमरान हाश्मीबरोबरच दिशा पाटनी, शबाना आझमी, श्रिया सरन हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.