Emraan Hashmi Genelia Deshmukh Afsana Banaya Aapne Song release : बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता इम्रान हाश्मीचा ‘गनमास्टर जी९’ (Gunmaster G9) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यापूर्वी सिनेमातील पहिले ‘अफसाना बनाया आपने’ हे गाणे प्रदर्शित झाले असून यामध्ये महाराष्ट्राची वहिनी जिनिलीया देशमुख झळकली आहे. जिनिलीया व इम्रान हाश्मी यांची जोडी आणि गाण्यातील त्यांची केमिस्ट्री पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. जिनिलीयाचा लूक आणि तिच्या दमदार डायलॉगने सुरू झालेले गाणे चर्चेत आले आहे.

‘आवारपन २’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केल्यानंतर आता इम्रान हाश्मीचा ‘गनमास्टर जी९’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेमातील पहिले गाणे ‘अफसाना बनाया आपने’ प्रदर्शित झाले असून यामध्ये जिनिलीया देशमुखचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. हे गाणे हिमेश रेशमियाने त्यांच्या मधूर आवाजात गायले आहे. अनेक वर्षांनंतर आयकॉनिक गायक हिमेश रेशमिया व इम्रान हाश्मी यांची ब्लॉकबस्टर जोडी पुन्हा एकत्र आली आहे.

प्रेम, भीती आणि रोमान्स

‘अफसाना बनाया आपने’ या गाण्याची सुरुवातच जिनिलीया देशमुखच्या दमदार एन्ट्रीने होते. “मत जोड़िए मुझसे रिश्ता, मेरे बारेमे तुम कुछ नहीं जानते,” या संवादातून तिच्या व्यक्तिरेखेची एक वेगळीच झलक पाहायला मिळते. त्यावर इम्रान हाश्मी म्हणतो, “पुरानी जानकारी तो कंपनियों को चाहिए होती है, मोहब्बतें अपनी नई दास्तान लिखती हैं,” यानंतर जिनिलीया आणि इम्रान यांच्यातील केमिस्ट्री हळूहळू खुलताना दिसते. प्रेम, भीती आणि रोमान्स या भावनांचा सुंदर मेळ या गाण्यात दिसून आला आहे.

जिनिलीया देशमुख

‘अफसाना बनाया आपने’ या गाण्यामध्ये पुन्हा एकदा जिनिलीया देशमुख होळीच्या रंगामध्ये रंगल्याचे दिसून आले आहे. होळीच्या रंगांमध्ये तिचे व इम्रानचे प्रेम दाखवण्यात आल्याने नेटकऱ्यांना ‘लय भारी’ या मराठी सिनेमाची आठवणी झाली आहे. यापूर्वी ‘लय भारी’ व ‘लय भारी २’ दोन्ही सिनेमांत होळीवरील रितेश व जिनिलीयाची गाणी गाजली होती. यानंतर आता ती इम्रान हाश्मीबरोबर होळीच्या रंगात रंगल्याचे दिसून आले आहे.

जिनिलीया देशमुख

‘गनमास्टर जी९’ सिनेमाचे दिग्दर्शन आदित्य दत्त यांनी केले असून येत्या २७ नोव्हेंबर रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. हा एक रोमँटिक ॲक्शन ड्रामा चित्रपट असून पहिल्याच गाण्याने सिनेमाबाबत उत्सुकता निर्माण केली आहे.