Emraan Hashmi Swine Flu : बॉलीवूड अभिनेता इमरान हाश्मीचा ‘आवारापन २’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. या सिनेमाची गाणी आणि अभिनेत्याचा अभिनय याचे प्रेक्षकांनी कौतुक केले. याचदरम्यान इमरान हाश्मीला स्वाइन फ्लूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे, यामुळे त्याच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

इमरान हाश्मीचा ‘आवारापन २’ सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून तो बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई करत आहे. अनेक वर्षांनंतर इमरान बॉलीवूडमध्ये परतल्यामुळे त्याच्या सिनेमाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सिनेमाच्या यशाची घोडदौड सुरू असताना इमरान हा स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. इमरान हाश्मीचा मेडिकल रिपोर्टचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इमरान हाश्मी शूटिंगसाठी गेलेला रांचीला

इमरान हाश्मी एका सिनेमाच्या शूटिंगसाठी रांचीला गेला होता. शूटिंगनंतर काही दिवसांपासून त्याची प्रकृती ठीक नव्हती, त्यामुळे त्याने काही वैद्यकीय तपासणी करून घेतल्यानंतर त्याला स्वाइन फ्लूची लागण झाल्याचं समोर आलं. त्यानंतर डॉक्टरांनी इमरानला काही दिवस आराम करण्याचा आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. पण, सध्या इमरानच्या प्रकृतीबाबत त्याच्याकडून किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

इमरान हाश्मीला स्वाइन फ्लू झाल्याचे समोर येताच त्याच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. बॉलीवूडमध्ये पुन्हा एकदा यश मिळवल्यामुळे इमरान हाश्मी हा चर्चेत आला आहे. त्याच्या ‘आवारापन २’ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून, सिनेमाने बॉक्स ऑफिसवर २०० कोटी रुपयांचा टप्पाही पार केला आहे. मात्र, सिनेमाच्या यशाच्या काळातच त्याला स्वाइन फ्लूची लागण झाल्याने त्याला काही काळ विश्रांती घ्यावी लागणार आहे.

‘आवारापन २’ बॉक्स ऑफिस कलेक्शन

इमरान हाश्मीच्या प्रकृतीबाबत चिंता वाढली असली, तरी दुसरीकडे त्याचा ‘आवारापन २’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. नितीन कक्कर दिग्दर्शित ‘आवारापन २’ या चित्रपटात इमरान हाश्मी ‘शिवम पंडित’ची भूमिका साकारताना दिसत आहे. त्याचबरोबर दिशा पटानी, पूरन गुरबानी आणि शबाना आझमी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत २०० कोटींची कमाई केली असून, इमरानच्या करिअरमधील हा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.