scorecardresearch

स्क्रिनवर तुझे किसिंग सीन पाहून पत्नीची प्रतिक्रिया काय असते? इमरान हाश्मी म्हणालेला, “ती मला…”

“चित्रपटाचं स्क्रिनिंग सुरू होतं आणि शेजारी बसलेली माझी बायको मला नखं मारत होती.”

Emraan-Hashmi-wife
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेता इमरान हाश्मीचा आज ४४ वा वाढदिवस आहे. चित्रपटांमधील त्याच्या भूमिकांमुळे ‘सिरियल किसर’ही म्हटलं जातं. इमरान चित्रपटांमध्ये खूप बोल्ड सीन देतो. त्याच्या या बोल्ड आणि किसिंग सीन्सवर त्याची पत्नी परवीन शाहनीची प्रतिक्रिया काय असते, असा प्रश्न एकदा त्याला विचारण्यात आला होता. त्यावर अभिनेत्याने दिलेलं उत्तर चांगलंच चर्चेत राहिलं होतं.

जेव्हा इमरान हाश्मीने चांगल्या व वाईट किसबद्दल केलेलं भाष्य, म्हणाला “‘मर्डर’मध्ये मल्लिका शेरावतबरोबर…”

काही जुन्या मुलाखतींमध्ये इमरानने सांगितलं होतं की चित्रपटांमध्ये किसिंग सीन केल्यामुळे त्याची बायको त्याला मारत असे. “ती अजूनही मारते, पण आता तुलनेने कमी मारते. आधी ती बॅगने मारायची आता हाताने मारते, मधल्या काही काळात मारण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे,” असं इमरानने २०१६ मध्ये त्याच्या ‘द किस ऑफ लाइफ’ या पुस्तकाच्या लॉन्चिंगवेळी सांगितलं होतं.

Video : दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही इमरान हाश्मीला किस करत राहिली ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, तब्बल पाच वेळा…

परवीन चिडल्यानंतर तो तिला कसे शांत करतो हे देखील त्याने सांगितलं होतं.“मी तिच्यासाठी हँडबॅग खरेदी करतो. प्रत्येक चित्रपटातील किसिंग सीनसाठी तिला एक बॅग गिफ्ट म्हणून देतो. तिच्याकडे बॅगांनी भरलेले एक कपाट आहे, तरीही तिला बॅगच हवी असते. आमच्या दोघांमध्ये ही डील झाली आहे,” असं त्याने सांगितलं होतं.

Video: गोष्ट पडद्यामागची: सचिन पिळगावकरांवर हल्ला झाला म्हणून मित्रानं ‘ते’ हॉटेलच खरेदी केलं; पाहा अनोख्या मैत्रीची गोष्ट!

एकदा एक किस्सा सांगत इमरान म्हणाला होता, “चित्रपटाचं स्क्रिनिंग सुरू होतं आणि शेजारी बसलेली माझी बायको मला नखं मारत होती. ‘तू काय केलं आहेस, तू मला हे सांगितलं नाहीस, तू जे काही करतोय ते बॉलिवूड नाही. तिच्या नखांमुळे मला जखम झाली होती आणि रक्त वाहू लागलं होतं.” परवीनने ‘क्रूक’ चित्रपट पाहिल्यानंतर त्याला मारलं होतं. “माझ्या चित्रपटांच्या पहिल्या स्क्रिनिंगमधून बाहेर पडल्यावर माझी पत्नी नेहमीच मला मारते. पण तिला माहीत आहे की हे माझं काम आहे, त्यामुळे मला ते सीन करावेच लागेल,” असं इमरान म्हणाला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 11:20 IST

संबंधित बातम्या