बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान व करीना कपूर खान यांच्या मुंबईतील वांद्रे (पश्चिम) येथील घरी दरोड्याचा प्रयत्न झाला. दरोडेखोरांनी घरातील महिला स्टाफशी वाद घातला. त्यानंतर सैफ अली खान तिथे पोहोचला. दोघांमध्ये झटापट झाली व दरोडेखोराने चाकूने केलेल्या हल्ल्यात सैफ जखमी झाला.

सैफ अली खानच्या घरी गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजता ही घटना घडली. ही घटना घडली तेव्हा सैफची मुलं तैमूर व जेह घरीच होती. दरोडेखोराबरोबर झालेल्या झटापटीत फक्त सैफ जखमी झाला असून इतर सदस्य सुरक्षित आहेत. सैफला एकूण सहा जखमा झाल्या. त्याच्या हाताला व मणक्याला लागलं आहे. त्याला रात्री साडेतीन वाजता लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यानंतर त्याच्यावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली.

हेही वाचा – “कुटुंबातील इतर सदस्य…”, पती सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबद्दल करीना कपूरची पहिली प्रतिक्रिया

सैफ अली खानच्या घरी घडलेल्या या घटनेबद्दल पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. सध्या पोलिसांचे पथक त्याच्या घरी चौकशी करत आहेत. एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायकदेखील घटनास्थळी पोहोचले आहेत.

हेही वाचा – मोठी बातमी! अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, वांद्रेतील घरात मध्यरात्री घडली घटना

पाहा व्हिडीओ –

विरल भयानी व इतर काही पापाराझींनी सैफ अली खानच्या घराबाहेरील व्हिडीओ पोस्ट केले आहेत. या व्हिडीओंमध्ये पोलिसांसह मीडियाचे लोक आणि त्यांचे चाहते दिसत आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक सैफच्या घराबाहेर दिसत होते. ते या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडीओमध्ये दया नायक काळ्या टी-शर्ट आणि जीन्समध्ये दिसत आहे. त्यांचा हा व्हायरल व्हिडिओ भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेही वाचा – “त्याच्या गृहसेविकेबरोबर वाद…”, सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांची पहिली प्रतिक्रिया

या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, सैफ अली खानच्या घरात एक अज्ञात व्यक्ती घुसला. सैफ आणि त्या व्यक्तीमध्ये झटापट झाली, त्यात सैफ जखमी झाला. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेची टीम सैफच्या वांद्रे येथील घरी पोहोचली आहे. घटनेच्या वेळी त्याची पत्नी करीना कपूर आणि मुले तैमूर आणि जेह घरात होते. इतर सर्वजण पूर्णपणे सुरक्षित आहेत.

Story img Loader