Esha Deol shares video: धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर २०२५ ला निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी त्यांच्या अनेक आठवणी सांगितल्या. अनेक जण भावूक झाले होते. अनेक कलाकारांनी त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला.
धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी हेमा मालिनी यांनी नुकतीच प्रार्थना सभा आयोजित केली होती. दिल्लीत आयोजित केलेल्या या प्रार्थना सभेत हेमा मालिनींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्या भावूक झाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांच्या मुली ईशा व अहाना देओल होत्या.
आता ईशाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये धर्मेंद्र यांच्या अभिनय क्षेत्रातील तसेच खासगी आयुष्यातील अनेक खास आणि सुंदर क्षण पाहायला मिळत आहेत.
धर्मेंद्र यांच्या आठवणीत लेक ईशा देओलने शेअर केला व्हिडीओ
ईशाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये धर्मेंद्र यांच्या ६५ वर्षांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीमधील अनेक आठवणी पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओच्या एका क्लिपमध्ये दिग्गज अभिनेते दिलीप कुमार एका पुरस्कार सोहळ्यात धर्मेंद्र यांचे कौतुक करीत असल्याचे क्षणही पाहायला मिळत आहेत.
या व्हिडीओमध्ये त्यांच्या अभिनय क्षेत्रातील काही खास क्षणांबरोबरच त्यांच्या खासगी आयुष्यातील क्षणही पाहायला मिळाले. काही दुर्मीळ फोटोही पाहायला मिळाले. त्यामध्ये त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर, त्यांची मुले सनी व बॉबी देओल आणि अजिता, विजेता देओल यांचे फोटोदेखील पाहायला मिळत आहे.
तसेच, ईशाचे हेमा मालिनी आणि वडील धर्मेंद्र यांच्याबरोबरचे काही फोटोदेखील पाहायला मिळत आहेत. धर्मेंद्र त्यांनी त्यांच्या मुलांबरोबर काही चित्रपटांत स्क्रीन शेअर केली आहे, ते काही फोटोदेखील पाहायला मिळाले. धर्मेंद्र आणि त्यांचा नातू करण देओल यांचे फोटो, व्हिडीओदेखील पाहायला मिळाले. व्हिडीओच्या शेवटी धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट ‘इक्कीस’मधील झलक पाहायला मिळत आहे.
धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांचे १९५४ ला लग्न झाले होते. त्यांना चार मुले आहेत. त्यानंतर १९८० मध्ये धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी लग्नगाठ बांधली. त्यांना ईशा व अहाना या दोन मुली आहेत.
दरम्यान, धर्मेंद्र यांची महत्त्वाची भूमिका असलेला इक्कीस हा सिनेमा २५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
