Premium

“मी नकार दिल्यावर सहनिर्मात्याने…”, इशा गुप्ताने सांगितले कास्टिंग काउचचे धक्कादायक अनुभव; म्हणाली, “दोघे जण…”

इशा गुप्ताला बॉलीवूडमध्ये करावा लागला कास्टिंग काउचचा सामना, अभिनेत्रीने सांगितले दोन अनुभव

Esha Gupta faced casting couch twice
इशा गुप्ताने केलं कास्टिंग काउचबद्दल भाष्य (फोटो इन्स्टाग्रामवरून साभार)

बॉलीवूडमधील बोल्ड अभिनेत्री इशा गुप्ता सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिच्या अभिनयाशिवाय स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. कोणत्याही गॉडफादरशिवाय बॉलीवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणारी इशा तिची मतं मांडत असते. आता तिने अभिनयसृष्टीतील कास्टिंग काउचच्या मुद्द्यावर वक्तव्य केलं आहे. तसेच तिने तिच्याबरोबर घडलेल्या दोन प्रसंगांचा उल्लेखही केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गौतमी पाटील आयकर भरते का? उत्पन्नात वाटेकरी कोण? ज्येष्ठ मराठी अभिनेत्याचे ७ प्रश्न; म्हणाले “प्रत्येक कार्यक्रमात राडा…”

इशाला एका निर्मात्याने तडजोड करण्यास सांगितलं होतं, पण तिने नकार दिला होता. या प्रसंगाचा उल्लेख करत इशा म्हणाली, “चित्रपट अर्धा शूट करून झाला होता. मी नकार दिल्यावर सहनिर्मात्याने निर्मात्याला सांगितलं की मला त्याला मी चित्रपटात नको आहे मग मी सेटवर काय करत आहे? यानंतर काही निर्मात्यांनी मला चित्रपटात कास्ट करण्यासही नकार दिला. जर मी काहीच तडजोड करणार नसेल तर मला चित्रपटात घेण्याचा काय फायदा? असंही या निर्मात्यांना माझ्याबद्दल बोलताना मी ऐकलं होतं.”

अक्षय कुमारमुळे नैराश्यात गेलेला रणदीप हुड्डा? अभिनेत्याने केला मोठा खुलासा; म्हणाला, “भीतीने मी माझी खोली…”

अभिनेत्रीने आणखी एका घटनेचा उल्लेख केला. तेव्हा ती आउटडोअर शूट करत होती. त्यावेळी दोन लोकांनी कास्टिंग काउचचा सापळा रचला होता, असा दावा तिने केला. “दोघे जण कास्टिंग काउचचा सापळा रचत होते. मला त्याबद्दल माहीत झालं होतं, पण तरीही मी तो चित्रपट केला होता. कारण त्यांच्या बाजूने ही एक छोटीशी चाल होती. आऊटडोअर शूटच्या वेळी मी त्यांच्या सापळ्यात अडकेन असं त्यांना वाटत होतं. मी पण हुशार होते, मी म्हणाले की मी एकटी झोपणार नाही. मी माझ्या मेकअप आर्टिस्टला माझ्या खोलीत झोपायला बोलावले,” असं इशा गुप्ताने सांगितलं.

कास्टिंग काउचचे अनुभव सांगताना चिडलेली इशा गुप्ता म्हणाली, “त्यांना वाटतं की आम्हाला काम हवं असेल तर आम्ही काहीही करू शकतो.” तसेच कास्टिंग काउचसारख्या गोष्टी स्टार किड्सबरोबर घडत नाही, असंही तिने नमूद केलं. एखाद्या निर्मात्याने स्टार किड्सबरोबर असे कृत्य करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचे पालक निर्मात्यांना मारतील, असं इशा म्हणाली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Esha gupta shared casting couch experiences says makers removed her from movie hrc

First published on: 30-09-2023 at 14:37 IST
Next Story
१३ वर्षांपूर्वी शाहरुखसह विशाल भारद्वाज बनवणार होते ‘हा’ चित्रपट, चित्रीकरणही सुरू होणार होतं, पण…