scorecardresearch

‘पठाण’ प्रदर्शित झाल्यास चित्रपटगृह जाळून टाकण्याची तरुणाने दिली धमकी; करणी सेनेशी आहे कनेक्शन

पठाण पहिल्या दिवशी ४० कोटीची कमाई करू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे

‘पठाण’ प्रदर्शित झाल्यास चित्रपटगृह जाळून टाकण्याची तरुणाने दिली धमकी; करणी सेनेशी आहे कनेक्शन
फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम

शाहरुख खानच्या ‘पठाण’ची जबरदस्त चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे, पण तरी सगळीकडे याचं ऍडव्हान्स बुकिंग अगदी जोरात सुरू आहे, शाहरुखचे चाहते तर त्याच्या या चित्रपटाची चातकाप्रमाणे वाट बघत आहेत. पहिल्या गाण्यापासूनच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला. दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या बिकिनीने कित्येकांच्या भुवया उंचावल्या. बऱ्याच लोकांनी यावर टीका केली तर काही या चित्रपटाला पाठिंबा दर्शवला.

पठाण पहिल्या दिवशी ४० कोटीची कमाई करू शकतो अशी शक्यतासुद्धा वर्तवण्यात येत आहे. शाहरुखचे चाहते त्याचा चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी उत्सुक आहेत, तर काही लोकांनी या चित्रपटाच्या विरोधात तीव्र आंदोलन करायला सुरुवात केली आहे. अहमदाबादच्या सायबर क्राइम पोलिसांनी चित्रपटगृह जाळण्याची धमकी देणाऱ्या माणसाला अटक केली आहे.

आणखी वाचा : वजन कमी करण्यावरुन शाहरुख खानने मारलेला अंबानींच्या मुलाला टोमणा; अनंत अंबानीने दिलं ‘हे’ उत्तर

शाहरुख खान आणि दीपिका पदूकोणचा ‘पठाण’ हा चित्रपट प्रदर्शित केल्यास ते चित्रपटगृह जाळून टाकण्याची धमकी ३३ वर्षीय तरुणाने दिली होती. नुकतीच त्याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. मीडिया रीपोर्ट आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणाचे नाव सनी शाह असून तो आधी करणी सेनेचा सभासद असल्याचं स्पष्ट झालं आहे. सनी शाहच्या या धमकीमुळे चित्रपटगृहाच्या मालकांच्या मनात धडकीच भरली.

चित्रपटाचं ऍडव्हान्स बुकिंग जोरात सुरू असून पटापट शोज हाऊसफुल्ल होत आहेत. या चित्रपटासाठी सगळेच खूप उत्सुक आहेत. याच दीपिका पदूकोण अॅक्शन मोडमध्ये आणि जॉन अब्राहम नकारात्मक भूमिकेत दिसणार आहेत. याबरोबरच डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणासारखे कलाकारही यात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ‘पठाण’ २५ जानेवारी रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-01-2023 at 12:38 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या