scorecardresearch

“तुम्हाला पैसे देऊन आम्ही…” बॉलिवूड अभिनेत्यांच्या मानधनावर प्रसिद्ध निर्मात्यांची संतप्त प्रतिक्रिया

त्यांची स्वतःची टी सिरीज नावाची कंपनी आहे. दिवंगत गुलशन कुमार हे त्यांचे वडील आहेत

“तुम्हाला पैसे देऊन आम्ही…” बॉलिवूड अभिनेत्यांच्या मानधनावर प्रसिद्ध निर्मात्यांची संतप्त प्रतिक्रिया
फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

करोना महामारीनंतर बॉलिवूड चित्रपट फारसे चालत नाहीत. दिग्गज अभिनेत्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. सध्या बॉलिवूडची अवस्था फारशी चांगली नाही तरीदेखील काही अभिनेते आपले मानधन कमी करत नाही त्यामुळे साहजिकच आता निर्मात्यांपुढे पेच पडला आहे. यावरच बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते भूषणकुमार यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.

बॉलिवूड कलाकारांचे मानधन हा विषय गेली अनेक वर्ष सुरु आहे. कलाकारांचे मानधन हे कोटींच्या घरात असते. चित्रपटव्यक्तिरिक्त त्यांचा चित्रपटाच्या कमाईतदेखील हिस्सा असतो. सध्या बॉलिवूडचे चित्रपट चालत नाहीत त्यामुळे निर्माते आता धास्तावले आहेत. यावरच भूषणकुमार पिंकव्हीलाशी बोलताना असं म्हणाले की बॉलिवूडमधील परिस्थिती काही अभिनेत्यांना माहित असूनदेखील ते त्याचे मानधन कमी करण्यास तयार नाहीत. काही अभिनेत्यांना सध्या मार्केटची परिस्थिती माहित आहे आणि त्यांनी मला सकारात्मक रिप्लाय दिला आहे. मात्र काहीजण म्हणाले ‘नाही आम्ही इतकेच मानधन घेणार नाहीतर चित्रपटात काम करणार नाही.’ मी आता अशा अभिनेत्यांबरोबर काम करणार नाही. मोठ्या चित्रपटांमध्ये अनेकांचे नुकसान झाले आहे आणि ते आपण पाहिले आहे. मग आम्ही तुम्हाला पैसे का द्यायचे. २० ते २५ कोटी तुम्ही घेणार मग आम्ही का नुकसान सहन करायचे? अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

Photos : “…म्हणून सॅम पाठी लागला” बॅकलेस फोटोतील ‘बोल्ड’ लूकवरून ‘दृश्यम २’ फेम अभिनेत्री ट्रोल

भूषणकुमार यांनी आजवर अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. अनेक दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम केले आहे. त्यांची स्वतःची टी सिरीज नावाची कंपनी आहे. दिवंगत गुलशन कुमार हे त्यांचे वडील आहेत. ‘तुम बिन’ या चित्रपटापासून ते निर्मिती क्षेत्रात उतरले.

“पठाण चालणार! आमचे हिंदू बघणार, पण मुस्लिम…” प्रसिद्ध चित्रपटागृहाच्या मालकाची भविष्यवाणी

२०२२ वर्षात आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा; चित्रपट आपटला, बॉलिवूडमधील सर्वात महागडा अभिनेता अक्षय कुमार, त्याचे मागच्या वर्षी ४ ते ५ चित्रपट आले मात्र एकही यशस्वी ठरला नाही. नुकताच प्रदर्शित झालेला ‘कुत्ते’ चित्रपटदेखील फारशी कमाई करत नाही असे दिसून आले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-01-2023 at 19:09 IST

संबंधित बातम्या