scorecardresearch

“त्यांच्या कर्माची फळं…” उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याबद्दल कंगना रणौतचं मोठं वक्तव्य

मुंबईतील कार्यालयावर कारवाई केल्यानंतर अभिनेत्री आणि शिवसेनेमध्ये चांगलंच तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं

kangana speaks about uddhav thackerey and sanjay raut
फोटो : इंडियन एक्सप्रेस

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर केंद्रीय निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं. उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का ठरला. अशात उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे शिंदे गटाने पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर जल्लोष केला. विविध ठिकाणी फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा केल्याचं आपण पाहिलं.

या एकूण प्रकारावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनेसुद्धा आता भाष्य केलं आहे. सोशल मीडियावर ज्यापद्धतीने सेलिब्रिटीज चाहत्यांशी संवाद साधतात तसच ‘AskKangana’ हे हॅशटॅग वापरत कंगनाने चाहत्यांशी संवाद साधला. यादरम्यान नेटकऱ्यांनी तिला भरपूर प्रश्न विचारले आणि त्यांची उत्तरंसुद्धा तिने अगदी तिच्या नेहमीच्या अंदाजात दिली. कंगनाचं ट्विटर अकाऊंट नुकतंच सुरू झाल्यानंतर तिने प्रथमच असा चाहत्यांशी संवाद साधला.

आणखी वाचा : ‘कांतारा २’साठी चाहते प्रचंड उत्सुक; चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची होणार एंट्री?

यादरम्यान एका ट्विटर युझरने तिला ‘शिवसेना या नावाच्या आणि चिन्हाच्या बाबतीत आलेल्या निकालावर तिची प्रतिक्रिया विचारली. त्या युझरने तिला विचारलं की “उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची अवस्था पाहून नेमकं कसं वाटतंय?” यावर कंगनाने अत्यंत योग्य तरी तिच्या हटके स्टाईलमध्ये उत्तर दिलं. कंगना म्हणाली, “दुस-याच्या नाशिबावर किंवा वाईट परिस्थितीवर कधीही हसू नये. ही भावना केवळ काही खालच्या थराला जाऊन विचार करणाऱ्यांच्या मनातच असते, मी त्याप्रकारची व्यक्ती नाही. त्यांना त्यांच्या कर्माची फळं मिळतायत एवढंच मला सध्या दिसत आहे. मी कायम माझ्या वैयक्तिक भावना बाजूला ठेवून या गोष्टींचं निरीक्षण करते.”

मध्यंतरी कोविड काळात कंगनाच्या मुंबईतील कार्यालयावर कारवाई केल्यानंतर अभिनेत्री आणि शिवसेनेमध्ये चांगलंच तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी कंगनाने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली होती, तर संजय राऊत यांनीही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कंगनावर जोरदार टीका केली होती. कंगना सध्या तिच्या आगामी ‘इमर्जन्सि’ या चित्रपटावर काम करत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-02-2023 at 16:51 IST
ताज्या बातम्या