अभिनेत्री श्रद्धा कपूर ‘तू झुठी में मक्कार’ चित्रपटापासून चांगलीच चर्चेत आहे. बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून श्रद्धाला ओळखले जाते. अभिनयाबरोबर श्रद्धाचा निरागसपणा, नम्रपणा नेटकऱ्यांना भावतो. नुकताच श्रद्धाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चाहता चक्क गुडघ्यावर बसत तिला प्रपोज करताना दिसत आहे. हेही वाचा- लग्न न करताना अभिनेत्री झाली आई; ट्रोल झाल्यावर सोडलं मौन, म्हणाली, “मी आधीच…” व्हिडिओमध्ये श्रद्धा तिच्या कारमधून खाली उतरताना दिसत आहे. श्रद्धा तिच्या गाडीतून खाली उतरताच एक चाहता गुलाब पुष्पगुच्छ घेऊन येताना दिसत आहे. एवढचं नाही तर त्याने मांडीवर बसत श्रद्धाला प्रपोज केलं. श्रद्धाही हसत हसत त्याच्या पुष्पगुच्छाचा स्विकार करताना दिसत आहे. तसेच त्याच्याबरोबर हात मिळवतानाही दिसत आहे. https://www.instagram.com/reel/CvbydALsbYR/?utm_source=ig_embed&ig_rid=c53e06d0-2198-4ab5-baa2-178741f644b5 या व्हिडीओवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांनी त्या चाहत्याला ट्रोल केलं आहे. एका यूजरने लिहिले "अरे, हा लप्पू झिंगूसारखा मुलगा सचिन कुठून आला?" तर दुसऱ्याने लिहिले - श्रद्धा खूप नम्र आणि फिट आहे. आणखी एकाने लिहिले "माझी हाफ गर्लफ्रेंड बन". तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले "भाऊ शाळेत जा, अभ्यास करा, इतक्या लहान वयात तो सेलिब्रिटींना प्रभावित करतोय." श्रद्धाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर नुकतचं तिने तिच्या आगामी चित्रपट 'स्त्री २' च्या पहिल्या शेड्यूलचे शूटिंग पूर्ण केलं आहे. निर्मात्यांनी नुकताच या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली होती. हा चित्रपट ऑगस्ट २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे.