scorecardresearch

“‘पठाण’पेक्षा ‘झिरो’ चांगला होता…”; चाहत्याच्या थेट प्रतिक्रियेवर किंग खानच्या उत्तराने वेधलं लक्ष, म्हणाला…

शाहरुख खानचा ‘झिरो’ हा चित्रपट चांगली कामगिरी करू शकला नव्हता. त्यामुळे त्याची ही थेट प्रतिक्रिया वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या.

zero pathaan

शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाला सर्वत्र तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्रदर्शनाच्या आधीपासूनच या चित्रपटाने नवे विक्रम नोंदवायला सुरुवात केली होती. तर आतापर्यंत या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत. एकीकडे हा चित्रपट रेकॉर्डब्रेक कामगिरी करत असतानाच दुसरीकडे मात्र काहींना हा चित्रपट फारसा आवडला नाहीये. आता एका नेटकऱ्याने ‘पठाण’पेक्षा ‘झिरो’ चांगला होता असं थेट शाहरुख खानला सांगितलं आहे.

‘पठाण’ प्रदर्शित झाल्यानंतर आता पहिल्यांदाच शाहरुख खानने चाहत्यांशी संवाद साधला. त्यासाठी त्याने ‘आस्क एसआरके’ (AskSRK) हे प्रश्न-उत्तरांचं एक सेशन ठेवलं होतं. या सेशनच्या माध्यमातून शाहरुखला त्याच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. शाहरुखनेही अनेक प्रशांना उत्तरं दिली. याच सेशनदरम्यान तुझ्या ‘पठाण’पेक्षा ‘झिरो’ चित्रपट चांगला होता असं एक नेटकरी त्याला म्हणाला.

आणखी वाचा : Pathaan box office collection: चौथ्या दिवशीही सर्वत्र ‘पठाण’चाच डंका, कमावला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

एका नेटकऱ्याने ट्वीट करत लिहिलं, “सर मी तुमचा चित्रपट पाहिला. पण मला असं वाटतं की ‘झिरो’ हा ‘पठाण’पेक्षा चांगला चित्रपट आहे.” शाहरुख खानचा ‘झिरो’ हा चित्रपट चांगली कामगिरी करू शकलेला नव्हता. त्यामुळे त्याची ही थेट प्रतिक्रिया वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या. परंतु शाहरुखनेही त्याला अगदीच खेळीमेळीचं वातावरण ठेवत उत्तर दिलं. त्याने लिहिलं, “हा तुमचा चांगुलपणा आहे. पण दुर्दैवाने तुमची संख्या शून्यपासून लाखोंपर्यंत असते.” आता त्याच्या या उत्तराने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या या उत्तरावर अनेकांनी त्याला विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याचप्रमाणे अनेकांनी त्याच्या हजारजबाबीपणाचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा : ‘पठाण’प्रमाणेच चित्रपटाचे मीम्सही चर्चेत, वाचल्यावर तुम्हालाही आवरणार नाही हसू

दरम्यान ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट चित्रपटगृहात उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने भारतातून ५० कोटी तर जगभरातून १०० कोटींची कमाई केली. तर या चार दिवसात या चित्रपटाने भारतातून २०० कोटींचा आकडा पार केला तर जगभरातून ३०० हून अधिक कोटींचा गल्ला जमवला आहे. रविवारी हा चित्रपट आणखीन चांगली कामगिरी करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 16:14 IST
ताज्या बातम्या