scorecardresearch

“आमचे पैसे परत दे…” फरहान अख्तरवर चाहते नाराज, जाणून घ्या नेमकं कारण काय?

काल फरहानने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली.

farhan-akhtar

बॉलिवूड कलाकारांबाबत सध्या प्रेक्षकांची नाराजी दिसून येत आहेत. गेल्या वर्षी अनेक बरे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरले. त्याचा परिणाम त्यांच्या कार्यक्रमांवरही होत आहे. अक्षय कुमारचा सेल्फी चित्रपट प्रदर्शित झाला. परंतु हा चित्रपट चांगली कामगिरी करताना दिसत नाहीये. याचाच परिणाम म्हणून त्याचा एक लाईव्ह कार्यक्रम रद्द करण्यात आला. तर त्यापाठोपाठ काल अभिनेता-गायक फरहान अख्तर याने देखील त्याचा परदेशी होणारा एक कॉन्सर्ट रद्द झाल्याची माहिती काल दिली. त्यामुळे त्याचे चाहते चांगलेच नाराज झाले आहेत.

फरहान अख्तर उत्तम अभिनेत्याबरोबरच उत्कृष्ट गायकही आहे. आतापर्यंत त्याने अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. त्यासोबतच त्याचा स्वतःचा बँडही आहे. जगभरातल्या विविध शहरांमध्ये त्याचे कॉन्सर्ट होत असतात. तर लवकरच तो ऑस्ट्रेलियामध्ये त्याचा एक लाईव्ह कार्यक्रम करणार होता. मात्र आता काही कारणाने तो रद्द करण्यात आला आहे.

आणखी वाचा : वडापाव आवडतो की पाणीपुरी? क्रिती सेनॉन म्हणाली, “मुंबईत आल्यापासून…”

काल फरहानने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. यात त्याने हा त्याचा ऑस्ट्रेलिया दौरा रद्द झाल्याचं जड अंतःकारणाने सांगितलं. त्याने लिहिलं, “माझे ऑस्ट्रेलियातील चाहते, काही कारणांमुळे आमचा बँड फरहान लाइव्हला आमचा ऑस्ट्रेलिया दौरा रद्द करावा लागत आहे. या आठवड्याच्या शेवटी आम्ही सिडनी आणि मेलबर्नला येऊ शकणार नाही. याबद्दल मी माझी निराशा तुमच्याशी शेअर करतोय. आम्ही आशा करतो की भविष्यात कधीतरी तुमच्या शहरात येऊन तुमच्यासाठी सादरीकरण करू. तुम्हा सगळ्यांवर खूप प्रेम.”

हेही वाचा : फरहाननं कशी मागितली होती शिबानीशी लग्न करायची परवानगी? आईनं केला खुलासा

पण फरहानने ही पोस्ट शेअर करताच त्याचे चाहते नाराज झालेले दिसले. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “आम्ही तुला भेटण्याची वाट पाहत होतो.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “हा शो का रद्द केला? आमच्या सगळ्या उत्सुकतेवर पाणी फिरलं.” तर आणखी एकाने लिहिलं, “आता आम्हाला आमचे पैसे परत कर…” फरहानची ही पोस्ट आता खूपच चर्चेत आली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-03-2023 at 09:54 IST