Farah Khan Ali on relationship with Bobby Deol: कलाकार त्यांच्या आयुष्यात पुढे गेले तरीही त्यांच्या भूतकाळाबद्दल, त्यांच्या रिलेशनशिपबद्दल सतत चर्चा होत असते. अनेकदा स्वत: कलाकार त्याबद्दल बोलत असतात, त्या चर्चा खऱ्या होत्या की फक्त अफवा होत्या याबद्दलही सांगत असतात. आता संजय खान व झरीन खान यांची मुलगी फराह खान अलीने बॉबी देओल व तिच्या नात्याबद्दल वक्तव्य केले आहे.
फराह खान अली काय म्हणाली?
फराह अली खानने विकी लालवाणीला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत बॉबी देओलबरोबरच्या नात्याबद्दल फराह म्हणाली, “आम्ही लहानपणीचे मित्र आहोत. मला तो आवडायचा. त्याला मी आवडायचे आणि आमच्यात इतकंच नातं होतं. आम्ही एकमेकांचे हात हातात धरायचो, आम्ही एकमेकांना पत्र लिहायचो; पण आम्ही एकमेकांना डेट करायचो नाही. तेव्हा आताच्या काळासारखे नव्हते. मी १६ वर्षांची होते, तो १७ वर्षांचे होता.ही जवळजवळ ४० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा आयुष्य खूप वेगळे होते. आता जेव्हा मुले १६ किंवा १७ वर्षांची असतात, तेव्हा आयुष्य खूप वेगळे असते.”
पुढे बॉबी देओल आणि त्याची पत्नी तान्या देओल यांच्याबरोबर कसे नाते आहे, याबद्दलही फराहने वक्तव्य केले. ती म्हणाली, “आज तो माझ्या सर्वांत जवळच्या मित्रांपैकी एक आहे. फक्त तो नाही, तर त्याची पत्नी तान्यासुद्धा माझी जवळची मैत्रीण आहे. त्या दोघांवर माझं मनापासून प्रेम आहे. ते माझ्यासाठी कुटुंबासारखे आहेत आणि मी त्या दोघांसाठी काहीही करायला तयार आहे. मला खूप आनंद आहे की, ते एकमेकांचे जोडीदार आहेत. कारण- ते एकमेकांसाठी अगदी योग्य आहेत.”
बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याआधी बॉबी देओल नीलम कोठारीसह रिलेशनशिपमध्ये होता. १९९० च्या सुरुवातीला ते वेगळे झाले. मात्र, नीलम आणि बॉबी यांच्यात जवळीक निर्माण झाल्यानंतर फराह त्याच्यापासून दूर गेली, अशा अफवा पसरल्या होत्या. त्यावर ती म्हणाली की आमच्यातील जे बॉण्डिंग होते, ते संपले होते. त्यानंतर नीलम व बॉबी यांच्यात जवळीक वाढली होती. त्यामुळे नीलममुळे आमचे ब्रेकअप झाले या चर्चांमध्ये काही तथ्य नाही.
फराह असेही म्हणाली की, मला प्रामाणिकपणा जपायला आवडतो आणि मी माझ्या आयुष्याबद्दल कायमच मोकळेपणाने बोलत असते.
नीलम कोठारीने एका मुलाखतीत खुलासा केला केला होता की, तिने बॉबी देओलबरोबरचे नाते कोणत्याही कौटुंबिक विरोधामुळे तोडले नव्हते. स्टारची पत्नी म्हणून जी जीवनशैली असते, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनिश्चितता असते आणि त्या भीतीमुळे ती बॉबी देओलपासून वेगळी झाली होती.
दरम्यान, फराह खान अलीच्या कामाबद्दल बोलायचे, तर ती लोकप्रिय ज्वेलरी डिझायनर आहे. ती हृतिक रोशनची एक्स पत्नी सुझेन खानची बहीण आहे.
