Farah Khan gifts expensive watch and diamonds: फराह खानने तिच्या दिग्दर्शनातून आणि कोरिओग्राफीमधून तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच तिने अनेक रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालक, जज म्हणूनही काम केले आहे. फराह तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीदेखील ओळखली जाते. याबरोबरच, तिच्या यूट्यूबवरील व्हिडीओंना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळते.
फराह खान तिचा कूक दिलीपबरोबर अनेक कलाकारांच्या घरी जाते. या निमित्ताने फराहबरोबर लोकप्रिय कलाकारांची घरे, त्यांचे इंटिरिअर, घरातील खास वस्तू, पेंटिंग पाहायला मिळते. आपले आवडते कलाकार कशा पद्धतीचे आयुष्य जगतात, त्यांच्या घरात काय-काय आहे हे चाहत्यांना पाहता येते. याबरोबरच कलाकार फराहसाठी काही खास पदार्थ बनवतात. काही पदार्थ सगळे मिळून बनवतात, तेही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते.
आता फराह खानने सोशल मीडियावर एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये फराह कोणाच्या घरी गेली नसून तिच्या घरी ‘है जवानी तो इश्क होना है’ सिनेमातील कलाकार आल्याचे पाहायला मिळाले. चित्रपटाचे दिग्दर्शक डेव्हिड धवन, कलाकार वरूण धवन, पूजा हेगडे व मृणाल ठाकूर हे कलाकार फराहच्या घरी आले होते. त्यांनी खूप गप्पा मारल्या. सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचे किस्से सांगितले. याबरोबरच, फराहने मृणाल व पूजाला असेही विचारले की जुन्या काळात हिरोईन एकमेकांचे केस ओढून भांडण करायच्या, तुम्ही तसे केले का? यावर त्यांनी नाही असे उत्तर दिले. इतकेच नाही तर त्यांनी जेवणही बनवल्याचे दिसले.
याबरोबर फराहने कलाकारांना महागडी गिफ्टही दिली. त्याची चर्चा सुरू आहे. आता फराहने कोणत्या कलाकाराला काय गिफ्ट दिले हे जाणून घेऊ…
फराहने वरूण धवनला काय भेट दिली?
फराहने लकी हार्वेची लाखो रुपये किमतीची घड्याळे डेव्हिड धवन व वरूण धवन यांना भेट दिली. ब्रँडच्या पेजनुसार, या घड्याळाची किंमत १,३०,००० रुपये आहे. ही खास भेट मिळाल्यानंतर दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. तसेच, फराहने अयानिका या ब्रँडचे लॅब-मेड हिऱ्याचे पेंडंट पूजा व मृणालला भेट दिले.
फराहने भेट दिल्यानंतर वरूण धवन असेही म्हणाला की, फराह खान यूट्यूबवर सर्वाधिक कमाई करणाऱ्यांपैकी एक आहे. तो गमतीने असेही म्हणाला की, करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण शो’मध्येही कधीही हिरे दिले गेले नाहीत.
दरम्यान, डेव्हिड धवन यांनी दिग्दर्शित केलेला ‘है जवानी तो इश्क होना है’ सिनेमा ५ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.
