फराह खानने दिग्दर्शित केलेला शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपट रिलीज होऊन आता १० वर्षे झाली आहे. त्यावर्षीच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्यांपैकी एक हा चित्रपट होता. मात्र हा चित्रपट बरीच वर्षे रखडला होता. जवळपास आठ कलाकारांनी सिनेमा नाकारला होता. फराहला ज्या कलाकारांबरोबर सिनेमा करायचा होता, त्यापैकी फक्त एकाच अभिनेत्याने चित्रपटासाठी होकार दिला. बाकी सगळे वेगळे कलाकार होते.

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, फराह खानने २००४ मध्ये आलेल्या ‘मैं हूं ना’च्या यशानंतर ‘हॅपी न्यू इयर’ बनवायचा ठरवलं होतं. तिला अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अक्षय कुमार, जुही चावला, मनीषा कोईराला, अमिषा पटेल, प्रियांका चोप्रा, रवीना टंडन आणि झायेद खान यांना सिनेमात घ्यायचं होतं, पण तसंच काहीच घडलं नाही.

Santosh Juvekar
काही चित्रपट पैशांसाठी करावे लागतात; प्रसिद्ध अभिनेता म्हणाला, “मी कलाकार असलो तरी….”
pandit hridaynath Mangeshkar
हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीच्या नोकरीत खरंच होते का? कधी?
vicky kaushal increase weight and also learn horse riding
‘छावा’मध्ये कास्ट करण्याआधी दिग्दर्शकाने विकी कौशलला सांगितलेल्या ‘या’ दोन गोष्टी; म्हणाला, “मी ७ ते ८ महिने…”
Film Acting Demar and Devar Hindi Cinema
चित्रपट: देमार आणि देव्हारपटांची पन्नाशी…
star pravah parivaar puraskar ceremony 2025
तारीख ठरली! ‘स्टार प्रवाह’ने केली पुरस्कार सोहळ्याची घोषणा, यंदा कोणती मालिका मारणार बाजी? नेटकरी म्हणाले…
zee marathi new serial promo tula japanar ahe promo announces
तारीख अन् मुहूर्त ठरला! ‘झी मराठी’ची थ्रिलर मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार; संपूर्ण स्टारकास्ट आली समोर, पाहा जबरदस्त प्रोमो
3g a killer connection kissing scenes
तब्बल ३० किसिंग सीन, बोल्ड दृश्यांचा भडीमार असलेला फ्लॉप बॉलीवूड चित्रपट, कमावलेले फक्त…
mns leader amey khopkar urge to marathi filmmaker
“थिएटर्समध्ये सिनेमा जगवायचा असेल तर…”, मनसे नेत्याची पोस्ट चर्चेत; मराठी सिनेमाकर्त्यांना म्हणाले, “लवकरच तारीख…”

हेही वाचा – राजीव कपूर यांना दारूचं व्यसन होतं, प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा; म्हणाली, “त्यांच्या निधनाच्या एक दिवसाआधी…”

२००६ मध्ये फराह खानने दीपिका पादुकोणला या चित्रपटासाठी साइन केलं होतं. पण जेव्हा ‘हॅप्पी न्यू इयर’ नंतर मागे पडला आणि तिने तिला ‘ओम शांती ओम’मध्ये घेतलं. ‘हॅप्पी न्यू इयर’ पुढची ६ वर्षे तसाच राहिला. या काळात फराहने ‘ओम शांती ओम’ आणि ‘तीस मार खां’ सारखे चित्रपट केले. २००९ मध्ये शिरीष कुंदरशी भांडण झाल्यावर शाहरुख आणि फराहमध्ये मतभेद झाले होते. आता ‘हॅपी न्यू इयर’ हा चित्रपट बनणार नाही, असं अनेकांना वाटत होतं. मग २०१२ मध्ये फराह आणि शाहरुखचे मतभेद दूर झाले आणि ‘हॅपी न्यू इयर’वर काम सुरू झाले.

नेटफ्लिक्सवर एकाच वेब सीरिजचे ३ सीझन ट्रेंडिंग; वाचा मागील आठवड्यात सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या १० सीरिजची यादी!

८ कलाकारांनी नाकारलेला सिनेमा

त्याचवर्षी ऑक्टोबरपर्यंत चित्रपटाचं स्क्रिप्टिंग पूर्ण झालं आणि शाहरुखने मुख्य भूमिकेसाठी होकार दिला. त्याआधी प्रियांका चोप्राला मुख्य भूमिकेसाठी निवडं होतं, पण नंतर तारखा जुळून न आल्याने तिने नकार दिला. मग सोनाक्षी सिन्हा, असिन, ऐश्वर्या राय बच्चन, परिणीती चोप्रा आणि कतरिना कैफसह इतर अनेक अभिनेत्रींचा विचार करण्यात आला. पण कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांनीही नकार दिला. शेवटी या भूमिकेसाठी दीपिका पादुकोणला निवडलं. जॉन अब्राहम आणि पृथ्वीराज सुकुमारन यांनीही हा चित्रपट नाकारला होता. अखेर सोनू सूदला त्या भूमिकेसाठी घेण्यात आलं होतं. मग नोव्हेंबर २०१३ मध्ये ‘हॅपी न्यू इयर’चे शूटिंग सुरू झाले.

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने ३१ डिसेंबरला बांधली लग्नगाठ, पारंपरिक पद्धतीने पार पडला सोहळा, पाहा Photos

२०१४ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट

शाहरुख खानचा चित्रपट ‘हॅपी न्यू इयर’ ऑक्टोबर २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता. बॉलीवूड हंगामाच्या वृत्तानुसार, या चित्रपटाने भारतात २८१.९४ कोटी रुपयांची कमाई केली होती. तसेच जगभरात या सिनेमाने ३८३.१ कोटी रुपये कलेक्शन केले होते. हा २०१४ मधील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता.

Story img Loader