गणेशोत्सवानिमित्त सध्या सर्वत्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींच्या घरी मोठ्या उत्साहात बाप्पाचं आगमन झालेलं आहे. अनुष्का शर्मा, श्रद्धा कपूर, रितेश देशमुख, राजकुमार राव यांसारख्या अनेक कलाकारांनी जल्लोषात बाप्पाचं स्वागत केलं. बॉलीवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान, राजकुमार रावची पत्नी पत्रलेखा आणि हुमा कुरेशी यांनी एकत्र गणेशोत्सव साजरा केला. याचा फोटो फराहने सोशल मीडियावर शेअर केल्यावर तिला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा : नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान, राजकुमार रावची पत्नी पत्रलेखा आणि अभिनेत्री हुमा कुरेशी यांनी एकत्र गणेशोत्सव साजरा केल्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी तिघींनीही पारंपरिक वेशभूषा केली होती. पण, या फोटोंमध्ये नेटकऱ्यांना फराह खानच्या पायात चप्पल दिसल्यामुळे तिला ट्रोल करण्यात आलं. एका युजरने, “कृपया, गणपतीसमोर चपला घालू नकोस…काढून ठेव” अशी कमेंट फराहने शेअर केलेल्या फोटोंवर केली. तर आणखी काही युजर्सनी, “बॉलीवूडकरांना काहीच कळत नाही”, “देवाला नमस्कार हा अनवाणी पायाने केला जातो.” अशा कमेंट्स करत तिला ट्रोल केलं.

हेही वाचा : Video: श्रद्धा कपूरने रश्मिका मंदानाला केलं इग्नॉर?; नेटकरी म्हणाले, “बॉलीवूडमधील लोकांना जास्त अहंकार…”

फराह खान तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. तिला ज्या गोष्टी पटत नाहीत, त्याबाबत ती नेहमीच स्वत:चं मत मांडते. तिने ट्रोलर्सच्या कमेंट्स गांभीर्याने घेत यातील एका नेटकऱ्याला “आम्ही घराबाहेर उभे होतो, खूप खूप धन्यवाद” असं उत्तर देत तिने स्वत:ची बाजू मांडली आहे.

हेही वाचा : ‘जवान’ने रचला इतिहास! १३ व्या दिवशी केली जबरदस्त कमाई, जगभरात कमावले तब्बल ‘इतके’ कोटी, वाचा आकडे

दरम्यान, फराहप्रमाणे राजकुमार रावची पत्नी पत्रलेखा हिनेही तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर गणपती बाप्पाच्या पूजेचे काही फोटो पोस्ट केले आहेत. हुमा आणि फराहबरोबरचा फोटो शेअर करत पत्रलेखाने कॅप्शनमध्ये ‘तीन देविया’ असं लिहिलं आहे.

Story img Loader