Farah Khan shares emotional post: फराह खान बॉलीवूडमधील लोकप्रिय कोरिओग्राफर, निर्माती, दिग्दर्शक आहे. त्याबरोबरच फराह खान विविध रिॲलिटी शोचे सूत्रसंचालनही करते. नुकतीच ती लॉकअप या रिअॅलिटी शोच्या दुसऱ्या सीझनचे सूत्रसंचालन करताना दिसली.
त्याबरोबरच फराह खान सोशल मीडियावरही सक्रिय असते. तिचे यूट्यूबवरील व्हिडीओही लोकप्रिय ठरताना दिसतात. ती विविध सेलिब्रेटींच्या घरी जाते, त्यांच्याबरोबर गप्पा मारते. तिच्या व्हिडीओंमधून चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकारांच्या घराची झलक पाहायला मिळते. त्याबरोबरच फराह कलाकारांच्या घरी गेल्यानंतर ते तिच्यासाठी खास पदार्थ करतात, त्यामुळे यूट्यूबवरही फराह सतत चर्चेत असते. आता फराह खान वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
फराह खानची तीनही मुले ‘या’ देशात गेली शिक्षणासाठी
फराह खानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमधून तिने तिच्या मुलांबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. तिची तीनही मुले एकाच वयाची असून, आता त्यांनी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे. विशेष बाब म्हणजे फराह व शिरीष कुंदर यांची तीनही मुले भारतात नाही, तर अमेरिकेत शिक्षणासाठी गेली आहेत. फराहने मुलांबरोबरचे काही खास फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पोस्ट करताना तिने तिच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.
तिने लिहिले, “तुमच्या मुलांना कॉलेजमध्ये पाठवणे, तुम्हाला अवघड वाटत असेल, तर त्याचा तीन वेळा विचार करा. ३ शहरे, ३ कॅम्पस, ३ निरोप. माझ्या हृदयाचे तीन तुकडे.” पुढे तिने फिल्मी स्टाईलमध्ये लिहिले, “जा, तुम्ही तुमचे आयुष्य जगा (जाओ, जी लो अपनी जिंदगी); पण सर्व रस्ते आई-वडिलांकडे परत येतात, हे लक्षात ठेवा.”
फराहने पुढे पती शिरीष कुंदरला टॅग करीत लिहिले, “तो फॅमिली फोटोमध्ये येण्याव्यतिरिक्त सगळं काही करतो.” तसेच, हा फोटो शेअर करताना तिने कभी अलविदा ना कहना हे गाणेही लावले आहे. फराहने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तीनही मुले एकत्र दिसत आहेत. तसेच, फराहबरोबरचे त्यांचे सुंदर फोटो पाहायला मिळत आहेत. फोटोंमधून त्यांच्यातील सुंदर बॉण्डिंग दिसत आहे.
फराहच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करीत फराह व तिच्या मुलांचे कौतुक केले. अभिनेता सिद्धार्थने सर्वोत्तम आई, अशी कमेंट केली आहे. तर, करण जोहरनेदेखील तशीच कमेंट केली आहे. सोनू सूद, मलायका अरोरा, गौहर खान, क्रांती रेडकर, शिल्पा शिरोडकर अशा अनेक कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत, अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.
दरम्यान, तिच्या मुलांनी म्हणजे दिवाने उद्योजकता आणि फायनान्स (Entrepreneurship and Finance) शाखेत बॅबसन कॉलेजमध्ये, अन्याने अर्थशास्त्र आणि डेटा सायन्स शाखेत न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये (NYU) व झारने (Czar) बिझनेसमधील आर्टिफिशियल इंटिलिजन्स ( Artificial Intelligence in business) शाखेत एमोरी युनिव्हर्सिटी(Emory University)मध्ये प्रवेश घेतला आहे.
