बॉलीवूड अभिनेता आमिर खान नेहमी चर्चेत असतो. आमिरला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणूनही ओळखले जाते. आमिर आपल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करतो. त्याला आपली तत्त्वं सगळ्यात जास्त प्रिय आहेत. या तत्तवांमुळेच एकदा आमिर खानने आपला जीव धोक्यात घातला होता. चित्रपट निर्माते महावीर जैन यांनी एका मुलाखतीत आमिरसंबंधित एक किस्सा सांगितला आहे.
चित्रपट निर्माते महावीर जैन यांनी बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत आमिरबाबत एक मोठा खुलासा केला आहे. जैन म्हणाले, ९० च्या दशकात आमिरने अंडरवर्ल्डने आयोजित केलेल्या पार्टीत जाण्यास नकार दिला होता. दिलेल्या मुलाखतीत महावीर म्हणाले, ९० च्या दशकात फिल्म इंडस्ट्रीवर अंडरवर्ल्डचे राज्य होते. त्यामुळे सगळ्या कलाकारांनी त्या पार्टीत हजेरी लावली होती. मात्र, आमिरने आपल्या तत्त्वांना मुरड घातली नाही आणि त्याने या पार्टीत जाण्यास सरळ सरळ नकार दिला.




जैन पुढे म्हणाले, आमिर त्याच्या तत्त्वांबद्दल इतका ठाम होता की जेव्हा तो ‘सत्यमेव जयते’ हा टीव्ही शो करत होता तेव्हा त्याने काही ब्रॅण्ड्सची जाहिरात करण्यास नकार दिला होता. ‘जवळपास तीन वर्षांपासून त्याने चार-पाच ब्रॅण्डची जाहिरात केली नाही, ज्याची तो अगोदर जाहिरात करत होता. कारण आमिरला वाटले की ‘सत्यमेव जयते’ हा एक गंभीर शो आहे आणि शोच्या मध्यभागी दुसऱ्या ब्रॅण्ड्सची जाहिरात करणे त्याचे गांभीर्य कमी करेल. त्यामुळे त्याने सर्व जाहिराती करण्यास नकार दिला होता.
हेही वाचा- “कतरिना दर आठवड्याला…”; विकी कौशलने केला संसाराबाबत मोठा खुलासा, म्हणाला…
आमिरच्या वर्कफ्रंटबाबत बोलायच झालं तर ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटातून आमिरने जबरदस्त कमबॅक करायचा प्रयत्न केला, पण या चित्रपटाला बॉयकॉट ट्रेण्डचा चांगलाच फटका बसला. प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे सपशेल पाठ फिरवली अन् तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. आमिरच्या कारकीर्दीतील हा आजवरचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट ठरला. यानंतर आमिर खानने अभिनयातून काही काळ ब्रेक घ्यायचं ठरवलं, तेव्हापासूनच आमिर लाइमलाइटपासून दूर आहे.