बॉलिवूडचा बॅचलर आणि सगळ्यांचा लाडका भाईजान अर्थात सलमान खान हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकतंच सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी चांगली कमाई केली. हा चित्रपट अगदीच ब्लॉकबस्टर ठरला नसला तरी प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला. सलमानच्या चित्रपटांबरोबरच त्याच्या खासगी आयुष्याची प्रचंड चर्चा होते. त्यातून त्याच्या लव्ह लाईफबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असते.

सलमान आणि ऐश्वर्या यांचं प्रेमप्रकरण चांगलंच गाजलं, ऐश्वर्याबरोबर बरेच खटके उडाल्यानंतर सलमानचं बऱ्याच अभिनेत्रींशी नाव जोडलं गेलं पण अद्याप सलमानने लग्न केलेलं नाही. बहुतेक प्रत्येक मुलाखतीमध्ये किंवा प्रेस कॉन्फरन्सदरम्यान सलमानला त्याच्या लग्नाबद्दल विचारलंच जातं आणि त्यावर सलमान त्याच्या खास शैलीत उत्तरही देतो. नुकतंच सलमानला एका इवेंटदरम्यान असाच एक प्रश्न विचारण्यात आला.

chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
Sameer Wankhede on aryan Khan arrest
आर्यन खानच्या अटकेनंतर जातीवरून केलं लक्ष्य, भ्रष्टाचाराचे झालेले आरोप; समीर वानखेडे म्हणाले, “प्रत्येक गोष्टीचा संबंध…”
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
transgender gets death sentence
साडी-चोळी दिली नाही, सूड भावनेतून तीन महिन्यांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून खून; तृतीयपंथीयाला फाशीची शिक्षा

आणखी वाचा : “व्हिस्कीची बाटली अन् अभिनेता…” निवृत्तीबद्दल सचिन पिळगांवकर यांचं मोठं वक्तव्य

‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यादरम्यान बऱ्याच बड्याबड्या स्टार्सनी हजेरी लावली यावेळी रेड कारपेटवर सलमान खानचा नवीन लूक चर्चेत आला. या इव्हेंटदरम्यान पत्रकारांशी गप्पा मारताना एका महिलेने सलमानला थेट लग्नासाठी मागणी घातली. ती म्हणाली, “सलमान तू माझ्याशी लग्न करशील का?” यावर सलमानने त्याच्या खास शैलीत उत्तर दिलं.

सलमान म्हणाला, “माझ्यासाठी लग्न करायचे दिवस संपल्यात जमा आहेत. तू मला २० वर्षांपूर्वी भेटायला हवी होतीस.” सलमानकडून हे उत्तर तसं अपेक्षितच होतं, पण तरी त्याने ही गोष्ट अगदी प्रांजळपणे कबूल केली. या इव्हेंटदरम्यान सलमानच्या दाढी आणि मीशीतील नव्या लूकचीही भरपूर चर्चा झाली. आता भाईजानच्या ‘टायगर ३’ची त्याचे चाहते आतुरतेने वाट पहात आहेत.