भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांचा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. निर्मात्यांनी व्हिडीओ शेअर करून त्यांच्या बायोपिकची घोषणा केली आहे. किरण बेदी यांच्या बायोपिकला ‘बेदी’ असं नाव देण्यात आलं आहे. हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होईल.

देशातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या जीवनावर आधारित बेदी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. निर्मात्यांनी जबरदस्त संगीतासह मोशन पोस्टर रिलीज केले आहे. या चित्रपटामध्ये तुम्हाला किरण बेदी यांच्या कधीही न ऐकलेल्या गोष्टींचा समावेश असेल असा दावा या व्हिडीओत करण्यात आला आहे.

सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “आजकालची मुलं आई-वडिलांची…”

दिग्दर्शक कुशल चावलाने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली. ‘ही आहे कुशल चावला लिखित आणि दिग्दर्शित डॉ. किरण बेदी यांच्या जीवनावरील बायोपिक फीचर फिल्मची घोषणा. तुम्हाला मोशन पोस्टर पाहून आनंद होईल अशी आशा आहे. अजून बरंच काही येणार आहे..पाहत राहा!’ असं कॅप्शन त्याने पोस्टला दिलं आहे.

बॉयफ्रेंडपेक्षा वयाने मोठी आहे सोनाक्षी सिन्हा, अभिनेत्री ३७ वर्षांची तर झहीर इक्बालचं वय…

किरण बेदी हे देशातील मोठं नाव आहे. त्या टेनिसपटूही होत्या. त्या १९७२ साली देशाच्या पहिला महिला आयपीएस झाल्या होत्या. ३५ वर्षे देशाची सेवा केल्यानंतर २००७ मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली. त्यावेळी त्या ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या महासंचालकपदावर होत्या.

किरण बेदी यांनी दिल्ली, गोवा, चंदीगड आणि मिझोराम याठिकाणी आयपीएस अधिकारी म्हणून काम केलं. अमृतसरमध्ये ९ जून १९४९ रोजी जन्मलेल्या किरण बेदी यांनी अंमली पदार्थांच्या व्यसनाच्या विरोधात अभियान चालवलं. त्यांनी तुरुंगात कैद्यांच्या धूम्रपानावर बंदी घातली. किरण बेदी यांनी इतरही अनेक सामाजिक कामं केली.