scorecardresearch

‘फोर मोअर शॉट्स प्लीज’ फेम अभिनेत्रीचा झाला साखरपुडा, फोटो शेअर करत म्हणाली…

मानवी गाग्रूने ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’ व ‘ट्रिपलिंग’ या वेब सीरिजसह अनेक चित्रपटांमध्येही काम केलंय.

‘फोर मोअर शॉट्स प्लीज’ फेम अभिनेत्रीचा झाला साखरपुडा, फोटो शेअर करत म्हणाली…
(फोटो – इन्स्टाग्राम)

‘फोर मोअर शॉट्स प्लीज’ फेम अभिनेत्री मानवी गाग्रू हिने साखरपुडा उरकला आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली. तिने अंगठी घातलेला एक फोटो शेअर करत साखरपुडा झाल्याचं सांगितलं. ती सध्या लंडनमध्ये सुट्टी घालवत आहे. परंतु मानवीचा होणारा पती कोण आहे, याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. अभिनेत्रीनेही त्याबद्दल काहीच सांगितलेलं नाही.

मानवी गाग्रू गेल्या काही दिवसांपासून लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. ती तिथले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. अशातच तिने तिच्या चाहत्यांना एंगेजमेंट रिंग दाखवताना एक फोटो शेअर करत आनंदाची बातमी दिली. “आणि हे घडलंय” असं कॅप्शन देत तिने खाली हॅशटॅग Engaged असं लिहिलंय. परंतु तिने कुणाशी साखरपुडा केलाय, याबद्दल काहीच सांगितलेलं नाही.

मानवीच्या या पोस्टवर मॉनी रॉय, सुमित व्यास, तिचे चाहते आणि इंडस्ट्रीतील मित्र-मैत्रिणी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. दरम्यान, मानवी गाग्रूने कीर्ती कुल्हारी, सयानी गुप्ता आणि बानी जे यांच्यासोबत ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’ या लोकप्रिय वेब सीरिजच्या तिन्ही भागात काम केलंय. याशिवाय ती सुमीत व्यासबरोबर ‘ट्रिपलिंग ३’ मध्येही दिसली होती. याशिवाय तिने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-01-2023 at 15:12 IST

संबंधित बातम्या