मृगदीप सिंग लांबा दिग्दर्शित फुकरे ३ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. २८ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने नाना पाटेकरांची मुख्य भूमिका असलेल्या ‘द व्हॅक्सिन वॉर’लाही मागे टाकले होते. आता या चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.
‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘फुकरे ३’ ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ८.५० कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ७.७१ कोटींचा गल्ला जमवला. तर तिसऱ्या दिवशी (शनिवारी) या चित्रपटाने ११.३० कोटींचा व्यवसाय केला आहे. ‘फुकरे ३’ ची एकूण कमाई २७.९३ कोटीपर्यंत गेली आहे.
‘फुकरे 3’ हा चित्रपट विवेक अग्निहोत्रीच्या ‘द वॅक्सिन वॉर’ चित्रपटासोबतच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. ‘फुकरे 3’ ने बॉक्स ऑफिसवर ‘द वॅक्सीन वॉर’ला मात दिली आहे. ‘द व्हॅक्सिन वॉर’ पहिल्या दिवसापासून फारशी कमाई करू शकलेला नाही. चित्रपटाने पहिल्या दिवशी सुमारे १.५० कोटी रुपयांची कमाई केली होती, तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ०.९ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आणि तिसऱ्या दिवशी केवळ १.५० कोटीपर्यंत गल्ला जमवू शकला
फुकरे ३’ चित्रपटात पुलकित सम्राट, वरुण शर्मा, मनजोत सिंग, रिचा चढ्ढा आणि पंकज त्रिपाठी यांची प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट ‘फुकरे’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. २०१३मध्ये याचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. त्यानंतर २०१७ साली ‘फुकरे २’ हा सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ‘फुक्रे ३’ चित्रपटाचे दिग्दर्शन मृगदीप सिंग लांबा यांनी केलं आहे. यापूर्वीच्या दोन्ही भागांचेसुद्धा दिग्दर्शन त्यांनीच केले आहेत. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेन्मेटने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.