scorecardresearch

Premium

‘फुकरे ३’ प्रदर्शनाच्या अगोदरच झाला लीक?; चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होण्याची शक्यता

२८ सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण प्रदर्शनाच्या अगोदरच चित्रपट ऑनलाईन लीक झाला आहे.

fukrey-3
फुकरे ३ ऑनलाईन लीक

दिग्दर्शक मृगदीप सिंग लांबा यांचा ‘फुकरे’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. या चित्रपटात पुलकित सम्राट, वरुण शर्मा, ऋचा चड्ढा, पंकज त्रिपाठी, अली फजल, यांची मुख्य भूमिका होती. उद्या म्हणजे (२८ स्पटेंबरला) या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, चित्रपटाबाबत मोठी बातमी समोर आली. प्रदर्शनाच्या अगोदरच हा चित्रपट ऑनलाईन लीक झाला असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे चित्रपटाच्या कमाईवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- Video: ना व्हीआयपी रांग, ना सुरक्षारक्षक…; Miss World मानुषी छिल्लरने घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, अभिनेत्रीचा साधेपणा पाहून नेटकरी म्हणाले…

jawan shah rukh khan reation on dunki
‘जवान’नंतर लवकरच येणार शाहरुख खानचा ‘डंकी’? राजकुमार हिरानींच्या ‘त्या’ ट्वीटची जोरदार चर्चा; म्हणाले, “ट्रेलर…”
dunki-prepone
शाहरुख खानच्या ‘डंकी’ची रिलीज डेट बदलणार? प्रभासच्या चित्रपटामुळे निर्मात्यांनी तारीख बदलल्याची चर्चा
jab-we-met-2
‘जब वी मेट २’बद्दल नवीन अपडेट समोर; करीना व शाहिदच साकारणार सिक्वेलमध्ये मुख्य भूमिका
akshay kumar
अक्षय कुमारने ‘वेलकम ३’ व ‘हेराफेरी ३’ चित्रपटांसाठी फीमध्ये केली घट? निर्मात्यांसमोर ठेवली ‘ही’ मोठी अट

मिळालेल्या माहितीनुसार काही ट्विटर वापरकर्त्यांनी वेबसाइट्सच्या विनामूल्य डाउनलोड लिंक दर्शविणारे YouTube लिंक आणि टेलीग्राम स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. त्यावर ‘फुक्रे ३ (२०२३) हिंदी HD प्रिंट सेन्सॉर कॉपी लीक झाली’ असे लिहिले आहे. मात्र, सत्य पडताळून पाहिले असता व्हायरल होत असलेली लिंक चुकीची असल्याचे दिसून आले. या लिंकमध्ये चित्रपटाऐवजी ट्रेलर आणि टीझर जोडण्यात आला आहे.

‘फुकरे ३’ हा चित्रपट ‘फुकरे’ या सिनेमाचा सिक्वेल आहे. २०१३मध्ये याचा पहिला भाग प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर २०१७ साली फुकरे २ हा सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘फुकरे ३’साठीही प्रेक्षक आतुर होते. आता लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा- लग्नानंतर परिणीती- राघव ‘या’ दिवशी देणार रिसेप्शन; ठिकाण आणि तारीख समोर

‘फुक्रे’ चित्रपटाच्या याआधी प्रदर्शित झालेल्या भागांमध्ये चार मित्रांची कथा दाखविण्यात आली असून या मित्रांना सहज पैसे कमवायचे असतात. ‘फुक्रे ३’ चित्रपटाचे दिग्दर्शन मृगदीप सिंग लांबा करत आहेत. यापूर्वीच्या दोन्ही भागांचे दिग्दर्शनसुद्धा त्यांनीच केले आहेत. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेन्मेटने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fukrey 3 online leaked on telegram youtube torrent before release dpj

First published on: 27-09-2023 at 15:37 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×