scorecardresearch

Premium

‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’ ने रक्षाबंधनला केली दमदार कमाई, जाणून घ्या दोन्ही चित्रपटाचे एकूण कलेक्शन

Gadar 2 Vs Omg 2 : सनी देओल व अक्षय कुमारच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर किती गल्ला जमवला? वाचा आकडे

gadar 2 vs OMG 2
गदर २ व OMG 2 चे बॉक्स ऑफिस कलेक्शन

११ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. एकीकडे सनी देओल आणि अमीषा पटेल स्टारर ‘गदर २’ रिलीज झाला, तर दुसरीकडे अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांचा ‘ओएमजी २’ चित्रपट प्रदर्शित झाला. दोन्ही चित्रपट त्यांच्या पूर्वीच्या चित्रपटांचे सिक्वेल आहेत. या दोन्ही सिक्वेलना इतक्या वर्षांनी रिलीज होऊनही प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळाला.

‘ड्रीम गर्ल २’ च्या कमाईत सहाव्या दिवशी मोठी वाढ, बजेट अवघे ३५ कोटी पण आतापर्यंत कमावले तब्बल…

jawan
शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपटगृहांनंतर ओटीटीवर घालणार धुमाकूळ; वाचा कधी व कुठे पाहता येणार?
shahrukh khan upcomig dunki unofficial remake of Dulquer Salmaan malayalam movie cia
‘या’ दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे शाहरुख खानचा ‘डंकी’? सोशल मीडियावर होतोय ट्रोल
prasad
अखेर कोडं सुटलं! ‘जिलबी’ चित्रपटात प्रसाद ओकबरोबर दिसणार ‘हे’ आघाडीचे मराठी कलाकार
why-kareena-loves-mumbai
मुंबई का आवडते? करीना कपूरने सांगितलं खरं कारण; म्हणाली “मला या शहरात…”

‘गदर २’ला पहिल्याच दिवशी बंपर ओपनिंग मिळाली, तर ‘OMG 2’ला देखील चांगला प्रतिसाद मिळाला होता. दोन्ही चित्रपट प्रदर्शित होऊन २० दिवस उलटले आहेत आणि दोन्ही चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत. रक्षाबंधनच्या सुट्टीचाही या चित्रपटांना फायदा झाला. या चित्रपटांनी २० व्या दिवशी किती कमाई केली ते जाणून घेऊयात.

“मी १५ व्या वर्षापासून त्यांचं कर्ज फेडलं”, गश्मीरने सांगितली वडिलांनी घर सोडल्यावरची परिस्थिती; म्हणाला, “बँकेत हाता-पाया पडून…”

‘गदर २’ ची कमाई किती?

‘सॅकनिल्क’च्या रिपोर्टनुसार, सनी देओलचा चित्रपट ‘गदर २’ रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यातही चांगली कामगिरी करताना दिसत आहे. तिसऱ्या रविवारी १६.१० कोटी रुपयांच्या कमाईनंतर, सोमवार आणि मंगळवारी कलेक्शनमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं. परंतु बुधवारी चित्रपटाच्या कमाईत वाढ दिसून आली.

४१ वर्षांच्या संसारानंतर आंतरधर्मीय लग्नाबाबत नसीरुद्दीन शाह म्हणाले, “मला हिंदू असलेल्या रत्नाशी…”

‘गदर २’ ने ३० ऑगस्टला ८.७५ कोटींची कमाई केली आहे. यासह २० दिवसांत चित्रपटाचे देशभरातील एकूण कलेक्शन ४७४.५ कोटी रुपये झाले आहे. चित्रपटाच्या जगभरातील कमाईबद्दल बोलायचं झाल्यास ६१० कोटींहून अधिकचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाने ओपनिंग वीकेंडला १०० कोटी आणि पहिल्या आठवड्यात २०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला होता.

ओएमजी २ ची एकूण कमाई किती?

रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर अक्षय कुमारच्या OMG 2 च्या कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे. ‘सॅकनिल्क’च्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने २० व्या दिवशी १.७५ कोटींचे शानदार कलेक्शन केले आहे. यासह चित्रपटाची एकूण कमाई १४०.१७ कोटींच्या आसपास पोहोचली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gadar 2 vs omg 2 box office collection on raksha bandhan know earning of sunny deol akshay kumar film hrc

First published on: 31-08-2023 at 09:15 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×