Premium

लाहोरची संस्कृती, इस्लाम धर्माचा अभ्यास…” ‘गदर’चित्रपटासाठी अमीषा पटेलने घेतली होती प्रचंड मेहनत; म्हणाली…

‘गदर’ चित्रपटाच्या निर्मित्यांनी शेअर केला जुन्या आठवणींचा व्हिडीओ

ameesha patel
'गदर' चित्रपटाच्या निर्मित्यांनी शेअर केला जुन्या आठवणींचा व्हिडीओ ( फोटो : इंडियन एक्स्प्रेस )

दोन दशकांपूर्वी सुपरहिट ठरलेल्या ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या सिक्वेलची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ‘गदर २’ मध्ये पुन्हा एकदा सनी देओल आणि अमीषा पटेलची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘गदर २’ ऑगस्ट महिन्यात चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने चित्रपटाच्या निर्मात्यांनी काही जुन्या आठवणींचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटासाठी विकी कौशलने शेअर केली खास पोस्ट म्हणाला, “दोन आठवडे झोपलो नाही, पण…”

‘गदर’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी अभिनेता सनी देओल आणि अमीषा पटेलकडून ‘तारा सिंग’ आणि ‘सकिना’च्या भूमिकांसाठी कशी तयारी करून घेतली याबाबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. या वेळी सनी देओलने सांगितले की, “चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्यासह चित्रपटाशी संबंधित सर्व कलाकार माझ्याकडे आले होते, त्यांनी मला चित्रपटाची कथा सांगितली आणि मी लगेच चित्रपटाला होकार दिला, कारण मला स्क्रिप्ट आवडली होती.”

हेही वाचा : Shark Tank India: प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार ‘शार्क टॅंक इंडिया’चा तिसरा सीझन; कसे आणि कुठे कराल रजिस्ट्रेशन? जाणून घ्या

अमीषा म्हणाली, “सकिनाच्या भूमिकेचा मी खूप अभ्यास केला होता. चित्रपटात मला एका मुस्लीम मुलीची भूमिका साकारायची असल्याने मी अनेक पुस्तकांचे वाचन केले. लाहोरच्या संस्कृतीबद्दल, इस्लाम धर्माबद्दल माहिती देणारी पुस्तके वाचली. महिनाभर अभ्यास केला. त्यानंतर सकिनाच्या भूमिकेसाठी मी पूर्णत: तयार झाले.”

हेही वाचा : Video : “छोटा भाई है मेरा”, सारा अली खानचे भावावर आहे जीवापाड प्रेम; दोघांचा ‘तो’ व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी भारावले

दरम्यान, २००१ प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. आता लवकरच सनी देओल आणि अमीषा पटेल पुन्हा एकदा ‘गदर २’ च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gadar ek prem katha starrer sunny deol and ameesha patel share their memories in new behind the scenes video sva 00