‘गदर: एक प्रेम कथा’ या सुपरहिट चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. सनी देओल आणि अमीषा पटेलच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका उडवून दिला होता. ‘गदर’च्या यशानंतर काही दिवसांपूर्वी निर्मात्यांकडून ‘गदर २’चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. ‘गदर २’च्या निमित्ताने प्रेक्षकांना सनी देओल आणि अमीषा पटेलची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे, परंतु तत्पूर्वी‘गदर: एक प्रेम कथा’हा २००१ मध्ये रिलीज झालेला चित्रपट निर्मात्यांनी पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : फोटोतील ‘या’ लहान मुलीला ओळखलंत का? आज आहे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

Bajrangi Bhaijaan
‘बजरंगी भाईजान’ला ९ वर्षे पूर्ण! शूटिंगदरम्यानचा व्हिडिओ शेअर करत निर्मात्यांनी जागवल्या आठवणी; पाहा व्हिडिओ
Director Sukathankar, audience,
आता रडकेपणाने मराठी चित्रपटांविषयी चर्चा करणार की… दिग्दर्शक सुकथनकर यांच्या प्रेक्षकांना कानपिचक्या
Anant Ambani Radhika Murchant Varun Grovar
“राजेशाही अराजकता निर्माण करते”, अनंत अंबानींच्या लग्नावरून लेखक वरूण ग्रोव्हर यांची जळजळीत टीका
actor nawazuddin siddiqui share opinion on big budget movie with loksatta representative mumbai
एवढा अवाढव्य निर्मितीखर्च कशासाठी? – नवाझुद्दीन सिद्दीकी
Narmada Bachao Andolan Medha Patkar sentenced to 5 month jail term in defamation case
मेधा पाटकर यांना ५ महिन्यांचा तुरुंगवास; आंदोलने, उपोषणे, कारावास आणि संघर्ष; कशी होती ‘नर्मदा बचाव’ची ३९ वर्षे?
ajit pawar first reaction after budget
“आम्ही नवखे नाही, एखादा निर्णय घेतल्यानंतर…”; अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
suborno bari worlds youngest professor
मूर्ती लहान पण किर्ती महान! कादंबरीकार आणि प्राध्यापक झाल्यानंतर आता होणार पदवीधर; कोण आहे १२ वर्षांचा चिमुरडा?
Who is Ravi Atri?
NEET UG Row : ‘नीट’ पेपरफुटीचा मास्टरमाईंड रवी अत्री कोण आहे?

‘गदर: एक प्रेम कथा’हा चित्रपट ९ जून २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून यानिमित्ताने निर्मात्यांनी एका खास ऑफरची घोषणा केली आहे. गदर चित्रपटाचे तिकीट दर फक्त १५० रुपये असतील आणि या सगळ्या तिकिटांवर तुम्हाला ‘बाय वन गेट वन फ्री’ची ऑफर मिळणार आहे. म्हणजेच एका तिकिटावर दोघांना चित्रपट पाहता येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना फक्त ७५ रुपयांत हा सिनेमा पाहता येणार आहे.

हेही वाचा : ओम राऊत-क्रिती सेनॉनच्या किसिंग व्हिडीओमुळे नवा वाद; मंदिरातील पुजारी संतापले, म्हणाले “हॉटेलच्या खोलीत जाऊन…”

‘गदर: एक प्रेम कथा’हा २००१ मध्ये रिलीज झालेला चित्रपट पुन्हा एकदा नव्या रुपात मुंबई, दिल्ली आणि जयपूरच्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणाऱ्या दुसऱ्या भागात अनेक अनेक व्यक्तिरेखा बदलण्यात आल्या आहेत. अमरिश पुरी, ओम पुरी, विवेक शौक, मिथलेश चतुर्वेदी, डॉली बिंद्रा, मुस्ताक खान, टोनी मिरचंदानी हे कलाकार दुसऱ्या भागात दिसणार नाहीत त्यामुळे चित्रपटात त्यांच्या जागा कोण घेणार याबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.