‘गदर: एक प्रेम कथा’ या सुपरहिट चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. सनी देओल आणि अमीषा पटेलच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका उडवून दिला होता. ‘गदर’च्या यशानंतर काही दिवसांपूर्वी निर्मात्यांकडून ‘गदर २’चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. ‘गदर २’च्या निमित्ताने प्रेक्षकांना सनी देओल आणि अमीषा पटेलची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे, परंतु तत्पूर्वी‘गदर: एक प्रेम कथा’हा २००१ मध्ये रिलीज झालेला चित्रपट निर्मात्यांनी पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा : फोटोतील ‘या’ लहान मुलीला ओळखलंत का? आज आहे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
‘गदर: एक प्रेम कथा’हा चित्रपट ९ जून २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून यानिमित्ताने निर्मात्यांनी एका खास ऑफरची घोषणा केली आहे. गदर चित्रपटाचे तिकीट दर फक्त १५० रुपये असतील आणि या सगळ्या तिकिटांवर तुम्हाला ‘बाय वन गेट वन फ्री’ची ऑफर मिळणार आहे. म्हणजेच एका तिकिटावर दोघांना चित्रपट पाहता येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना फक्त ७५ रुपयांत हा सिनेमा पाहता येणार आहे.
‘गदर: एक प्रेम कथा’हा २००१ मध्ये रिलीज झालेला चित्रपट पुन्हा एकदा नव्या रुपात मुंबई,
मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadar re release makers give big suprise to audience announce buy 1 get 1 ticket offer sva 00