नव्व्दच्या दशकात प्रत्येक चित्रपटात एक गोष्ट सारखी होती ती म्हणजे ‘प्रेमकहाणी’, त्या दशकातील प्रत्येक दिग्दर्शकाने आपापल्या परीने प्रेमाचे वेगवेगळे रंग प्रेक्षकांना दाखवले आहेत. याच काळात अनेक स्टार्स उदयास आले. त्यावेळी मल्टीस्टारकास्ट चित्रपट असायचे. दोन अभिनेते, २ अभिनेत्रींना घेऊन चित्रपट हिट होत. असाच एका चित्रपट म्हणजे ‘अंदाज अपना अपना’ हा चित्रपट, सलमान खान आमिर खान या जोडगोळीने पडद्यावर धमाल आणली होती. आता याच चित्रपटाच्या सिक्वेलवर दिग्दर्शकांनी भाष्य केलं आहे.

८० चं दशक गाजवणारे राजकुमार संतोषी ‘गांधी-गोडसे एक युद्ध हा चित्रपट बऱ्याच वर्षांनंतर घेऊन येत आहेत. अमर उजालाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एकूणच चित्रपट, बॉलिवूड आणि त्यातील स्टार्सवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यात त्यांना त्यांच्या ‘अंदाज अपना अपना’ चित्रपटाचा सिक्वल येणार का? प्रत्येक वर्षी अशी अफवा येते? असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “हो बऱ्याच जणांनी हे प्रयत्न केले आहेत मात्र कायदेशीररित्या ते बनवू शकत नाही. त्या चित्रपटातील सर्व पात्र मी तयार केली आहेत. अंदाज अपना अपना’ हे जग मी निर्माण केले आहे. कोणीही ते बनवण्याचे धाडस करणार नाही कारण त्यावर कोणाचाही अधिकार नाही.”

Sharad Pnkshe reaction on Article 370
यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसने काय वाटोळं…”
Jawan director atlee failed ranveer singh with his super dancing skills
Video: रणवीर सिंहपेक्षा जबरदस्त डान्स करतो ‘जवान’ चित्रपटाचा दिग्दर्शक अ‍ॅटली, पाहा व्हिडीओ
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
bade miyan chote miyan Vs maidan
अजय देवगण की अक्षय कुमार, कोणाच्या चित्रपटाने केली ग्रँड ओपनिंग? दोन्ही चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन….

“गुटखा विकणारे स्टार्स आदर्श…” ‘गांधी गोडसे’ चित्रपटाच्या दिग्दर्शकांची संतप्त प्रतिक्रिया

ते पुढे म्हणाले, “खरं सांगायचं तर मला हीत्या चित्रपटाचा सिक्वेल बनवायचा नाही. माझा विश्वास आहे की एखादी गोष्ट एकदा बनली की तिला पुन्हा हात लावू नये. मी अशीच एक विनोदी प्रेमकहाणी लिहली आहे. पण त्याचे स्वतःचे एक वेगळे विश्व आहे. दिवाळीच्या सुमारास मी त्याची घोषणा करेन.” अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘बॉयकॉट पठाण’ मोहिमेवर प्रसिद्ध चित्रपटगृहाच्या मालकांनी केलं भाष्य; म्हणाले…

दरम्यान ‘अंदाज अपना अपना’ हा चित्रपट १९९४ साली प्रदर्शित झाला होता. एक कल्ट क्लासिक म्हणून या चित्रपटाकडे बघितले जाते. या चित्रपटात सलमान खान, आमिर खान, रविना टंडन, करिष्मा कपूर, परेश रावल, विजू खोटे, शक्ती कपूर अशी मोठी स्टारकास्ट होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही, मात्र आजही प्रेक्षकांच्या तो लक्षात आहे.