scorecardresearch

Premium

कार अपघात प्रकरणी गायत्री जोशीचे पती विकाश ओबेरॉय यांची चौकशी सुरू; दोषी आढळल्यास होऊ शकते ७ वर्षांची शिक्षा

आता या प्रकरणाची चौकशी सुरू असून. गायत्रीचे पती विकास ओबेरॉय यांच्या कारची तपासणी सुरू आहे

gayatri-joshi
फोटो : इंडियन एक्सप्रेस

बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असलेला अभिनेता शाहरुख खानचा ‘स्वदेस’ चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. याच चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री गायत्री जोशीच्या कार अपघाताची बातमी काल समोर आली. या अपघातात गायत्री आणि तिचा पती विकास ओबेरॉय दोघेही जखमी झाले. तर दुसऱ्या गाडीमध्ये असलेल्या एका स्विस जोडप्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली.

हाती आलेल्या माहितीनुसार हा भीषण अपघात इटलीच्या सार्डिनिया भागात घडला. यावेळी गायत्री जोशी तिचा पती विकास ओबेरॉयसह निळ्या रंगाच्या लॅम्बोर्गिनी कारमधून प्रवास करत होती. यावेळी त्यांच्या आजूबाजूला काही आलिशान गाड्याही दिसत आहेत. यादरम्यान एका गाडीने मिनी ट्रकला ओव्हरटेक करतेवेळी त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. त्यामुळे पुढे असलेला मिनी ट्रक हवेत उडाला आणि तो ट्रक पलटी झाला. त्यापुढे असलेल्या फेरारी कारलाही आग लागली. त्यामुळे त्या कारमध्ये बसलेल्या स्विस जोडप्याचा जागीच मृत्यू झाला.

Jayant Patil on Ajit Pawar comparision to Modi- Shah
‘तुलना कुणाशी करायची, याचं भान…’, अजित पवारांच्या ‘त्या’ दाव्यानंतर जयंत पाटील यांचा टोला
Prakash AMbedkar Mahavikas Aghadi
‘वंचित’चं महाविकास आघाडीला पत्र, म्हणाले “दोन दिवसांत…”, पत्रात नेमकं काय म्हटलंय?
ministry of women and child development internship program marathi news, two months internship program for woman marathi news
शासकीय योजना : स्वावलंबी भारतासाठी इंटर्न व्हा
uddhav thackeray shiv sena protest against zilla parishad officers for dancing on zingaat song
सांगली: जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचे झिंगाट नृत्यावर शिवसेनेचा आक्षेप, कारवाई करण्याची मागणी

आणखी वाचा : आमिर खानचा ‘३ इडियट्स’ व अनिल कपूरचा ‘परींदा’ पुन्हा होणार प्रदर्शित; नेमकं कारण ठाऊक आहे का?

आता या प्रकरणाची चौकशी सुरू असून. गायत्रीचे पती विकास ओबेरॉय यांच्या कारची तपासणी सुरू आहे. याबरोबरच आता विकास ओबेरॉय यांचीही इटली पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात जर ते दोषी ठरले तर त्यांना ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते असं ‘डेली मेल’च्या रीपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

या अपघाताबद्दल फ्रीप्रेस जर्नलशी संवाद साधताना गायत्री म्हणाल, “मी आणि विकास आम्ही दोघेही इटलीमध्ये आहोत. आमचा एक दुर्दैवी अपघात झाला, परंतु आम्ही दोघेही सुखरूप आहोत.” सध्या या जोडप्याच्या कार अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. भारतात तर या प्रकरणावरुन जोरदार चर्चा सुरू आहे.

गायत्री जोशीने २००४ मध्ये ‘स्वदेस’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात शाहरुख खानबरोबर मुख्य अभिनेत्री म्हणून झळकली. पण या चित्रपटानंतर तिने अभिनय क्षेत्रातून काढता पाय घेतला. यानंतर काही वर्षांनी तिने ओबेरॉय कन्स्ट्रक्शनचे व्यवस्थापकीय संचालक विकास ओबेरॉय यांच्याशी लग्न केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gayatri joshis husband vikas oberoi may face up to 7 years in jail if found at fault in italy car crash avn

First published on: 05-10-2023 at 18:38 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×