बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय कोरिओग्राफर म्हणून गीता कपूरला ओळखले जाते. काही दिवसांपूर्वी ती छोट्या पडद्यावरील ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’मध्ये परीक्षक म्हणून झळकली होती. या शिवाय इंडिया डान्स, सुपर डान्स, इंडिया के मस्त कलंदर आणि इंडियाज बेस्ट डान्सर या रिअॅलिटी शोमध्ये गीताने परीक्षक म्हणून काम केले आहे. तिला सर्वत्र गीता माँ म्हणूनच ओळखले जाते. या नावामुळे ती फार प्रसिद्ध आहे. मात्र नुकतंच गीताने तिच्या ट्रोलिंगबद्दल, वाढलेल्या वजनाबद्दल भाष्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गीताने वयाच्या १५ व्या वर्षापासूनच डान्सच्या करिअरला सुरुवात केली होती. तिने ‘तुझे याद ना मेरी आइ’, ‘गोरी गोरी’ अशा अनेक गाण्यांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले आहे. मात्र अनेकदा तिला तिच्या वाढलेल्या वजनामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला. नुकतंच मनीष पॉलच्या दिलेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीत गीता कपूरने अनेक विषयांवर भाष्य केले. या पॉडकास्टमध्ये तिने यावर सडेतोड उत्तर दिले आहे.
आणखी वाचा : “आपण जे बघतो त्यावर…” मानसी नाईकच्या गंभीर आरोपांवर पतीचे सडेतोड उत्तर

यावेळी बोलताना ती म्हणाली, “मी म्हशीसारखी दिसते आणि त्यामुळे मी काम सोडून द्यावे, असे मला अनेकजण सांगायचे. याबद्दल मला अनेकांनी मेलही केलेले आहेत. तसेच मला अनेकदा अश्लील कमेंट्सही मेलमध्ये आल्या आहेत. एक दिवस मी याचा विचार करुन फार दु:खी झालो. नक्की काय करावे मला काहीही कळत नव्हते. त्यावेळी लोक माझे काम बघत नव्हते. मी दोन माणसांच्यामध्ये बसते. त्यांच्यात बसून मी माझे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतेय, याबद्दल कोणाला काहीही नव्हते. ते कोणीही बघत नव्हते.”

“मी करत असलेली मेहनत कोणीही पाहत नव्हते. त्यावेळी सगळे मला हेच विचारत होते की मी इथे काय करतोय? मला अनेकजण जाडी, लठ्ठ असं म्हणायचे. काहींनी तर मला तू म्हशीसारखी दिसतेस, असंही म्हटलं. कारण टेरेन्स हा दिसायला चांगला होता आणि त्यावेळी रेमोचीही एक वेगळी छाप होती. त्यामुळे लोक असा विचार करायचे की ही जाड्या म्हशीसारखी दिसणारी मी इथे काय करत आहे”, असेही तिने म्हटले.

आणखी वाचा : “एवढ्या खालच्या थराला…” मानसी नाईकने सांगितले घटस्फोट घेण्यामागचे कारण

दरम्यान गीताने फराह खानला असिस्ट केले होते. त्यानंतर तिने कुछ कुछ होता है, दिल तो पागल है, कभी खुशी कभी गम, मोहब्बतें, कल हो ना हो, मैं हूं ना आणि ओम शांति ओम अशा अनेक चित्रपटांसाठी असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून काम केले. त्यानंतर तिने फिजा, अशोका, साथिया, हे बेबी, अलादीन, तीस मार खान या चित्रपटातील गाणे कोरिओग्राफ गेले. त्यानंतर गीताला लोकप्रियता मिळाली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Geeta kapur recalls the time when she was body shamed said i was really upset nrp
First published on: 30-11-2022 at 18:41 IST