Genelia And Riteish Deshmukh : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामुळे रितेश देशमुख चांगलाच चर्चेत आला होता. ६ ऑक्टोबरला शोचा ग्रँड फिनाले पार पडल्यावर अभिनेता तातडीने परदेशात शूटिंगनिमित्त रवाना झाला. मध्यंतरीच्या काळात रितेश पूर्णपणे त्याच्या कामात व्यग्र होता. त्यामुळे आता दिवाळी सणाच्या आधी देशमुख कुटुंबीय सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी इंडोनेशिया दौऱ्यावर गेले आहेत.
जिनिलीया व रितेश देशमुख ( Genelia And Riteish ) यांना रियान व राहील अशी दोन मुलं आहेत. हे कुटुंबीय मुलांच्या शाळेला सुट्ट्या पडल्यावर आणि शूटिंगमधून ब्रेक मिळाल्यावर नेहमीच विविध ठिकाणी फिरायला जातात. दिवाळीचा सण सुरू होण्याआधी मिस्टर अँड मिसेस देशमुख बाली फिरण्यासाठी गेले आहेत.
हेही वाचा : “लग्न झाल्यावर वनवास भोगायला…”, पुरस्कार जिंकल्यावर प्रसादच्या खऱ्या आयुष्यातील ‘पारू’ची खास पोस्ट! अमृता म्हणाली…
जिनिलीयाने शेअर केले खास फोटो
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिनिलीया बालीमधले सुंदर असे समुद्रकिनारे, निसर्गरम्य वातावरण, इंडोनेशियातील संस्कृतीची झलक, तिकडची पर्यटनस्थळे यांचे फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर करत आहे. रितेश-जिनिलीया आपल्या दोन्ही मुलांसह बालीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचं हे फोटो अन् व्हिडीओ पाहून लक्षात येत आहे.
बालीमधल्या घनदाट जंगलात उंच झुल्यावरून झोका घेणं म्हणजेच ‘Bali Swing’ हे याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचं गेल्या काही वर्षांपासून मुख्य आकर्षण झालेलं आहे. जिनिलीयाचा लेक सुद्धा या झुल्यावर बसून आनंद घेतल्याचं अभिनेत्रीने शेअर केलेल्या एका स्टोरीमध्ये पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने या व्हिडीओला, “बालीमध्ये आल्यावर हा आनंद घेणं मँडेटरी आहे” असं कॅप्शन दिलं आहे.
देशमुख कुटुंबीय दरवर्षी दिवाळीचा सण लातूरमध्ये साजरा करतात. त्यामुळे दिवाळीआधी हे दोघंही भारतात परतण्याची शक्यता आहे. दरम्यान, रितेश व जिनिलीयाच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेता येत्या काळात बहुप्रतिक्षीत ‘हाऊसफुल्ल ५’ चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय जिनिलीया लवकरच ‘सितारें जमीन पर’ चित्रपटात आमिर खानबरोबर झळकण्याची शक्यता आहे.