Genelia and Riteish Deshmukh : बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख हा महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा आहे. आज विलासराव देशमुख यांची पुण्यतिथी आहे. रितेशचं आपल्या वडिलांबरोबर फारच जवळचं नातं होतं. वडिलांच्या जाण्याचं दु:ख त्याच्या मनात आजही कायम आहे. रितेशची पत्नी जिनिलीयाला विलासराव देशमुख हे आपल्या सुनेपेक्षा जास्त आपली मुलगी मानायचे. आज त्यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त रितेश - जिनिलीयाने भावुक पोस्ट शेअर केल्या आहेत. रितेशने वडिलांचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. वडिलांच्या आठवणीत भावुक होत अभिनेता लिहितो, "माय फॉरएव्हर, माझे सर्वस्व… पप्पा तुमची खूप आठवण येते" दरम्यान, विलासराव देशमुख हे १९९९ ते २००३ आणि २००४ ते २००८ या काळात महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री होते. हेही वाचा : “वर्षा ताईंच्या मातृत्त्वावर बोलणं कितपत योग्य?”, निक्कीच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे मोठा वाद; माफी मागूनही नेटकरी संतापले… रितेश व जिनिलीया देशमुख यांच्या भावुक पोस्ट रितेशप्रमाणे त्याची पत्नी जिनिलीयाने ( Genelia and Riteish Deshmukh ) देखील पोस्ट शेअर करत सासऱ्यांना अभिवादन केलं आहे. "आजोबा, प्रत्येक दिवस, प्रत्येक सेकंद आणि प्रत्येक क्षणाला तुमची आठवण आम्हाला येत राहणार…" असं अभिनेत्रीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. रितेश-जिनिलीयाची दोन्ही मुलं राहिल अन् रियान या फोटोमध्ये त्यांच्या आजोबांना नमस्कार करत असल्याचं पाहायला मिळत आहे. ( फोटो सौजन्य : Genelia and Riteish Deshmukh इन्स्टाग्राम ) हेही वाचा : Video: श्रीदेवींच्या जयंतीनिमित्ताने लेक जान्हवी कपूरने घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन, बॉयफ्रेंडसह नतमस्तक होऊन घेतले आशीर्वाद रितेश देशमुखच्या पोस्टवर असंख्य नेटकऱ्यांनी कमेंट्स करत विलासराव देशमुख यांना अभिवादन केलं आहे. "खरंच साहेब पाहिजे होते.. चित्र वेगळं असतं", "महाराष्ट्राचा कोहिनूर हिरा….विनम्र अभिवादन साहेब", "महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांना विनम्र अभिवादन" अशा प्रतिक्रिया रितेशच्या पोस्टवर आल्या आहेत. ( फोटो सौजन्य : Genelia and Riteish Deshmukh इन्स्टाग्राम ) हेही वाचा : घरी मालिका बघताना नवीन सोढीची एंट्री पाहिली अन्…; गुरुचरण सिंगला न सांगता ‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांनी केलेलं रिप्लेस दरम्यान, जिनिलीया व रितेश देशमुखच्या ( Genelia and Riteish Deshmukh ) कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या अभिनेता 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचं होस्टिंग करत आहे. तर, जिनिलीया लवकरच 'सितारे जमींन पर' या चित्रपटात आमिर खानबरोबर झळकणार आहे.