कलाक्षेत्रातील आदर्श जोडप्यांपैकी एक जोडपं म्हणजे रितेश देशमुख व जिनिलिया देशमुख. या दोघांच्या लग्नाला आता १० वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे. पण दोघांमधील प्रेम पाहून त्यांचा अगदी हेवा वाटतो. जिनिलीयाने तर काही वर्ष अभिनयक्षेत्रामधून ब्रेक घेत संसाराकडे लक्ष दिलं. कुटुंबियांची आजही ती उत्तम काळजी घेते. त्यांचा सांभाळ करते. इतकंच नव्हे तर मराठी नसूनही तिने मराठी भाषा बोलण्यास सुरुवात केली. आज ती उत्तम मराठी बोलते. तसेच मराठी परंपरेचा आदरही करते.
महाराष्ट्राची सून असलेल्या जिनिलीयाला मराठी संस्कृतीची जाण आहे. म्हणूनच ती प्रत्येक मराठी सणही अगदी उत्साहात साजरे करते. आताही तिने वटपौर्णिमा साजरी केली. घरीच वडाच्या झाडाच्या फांदीची जिनिलीयाने पूजा केली. यादरम्यानचा फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंद्वारे शेअर केला आहे. तसेच याचबरोबर खास संदेशही लिहिला आहे.
आणखी वाचा – दोन विवाहित अभिनेत्यांबरोबर होतं श्रीदेवी यांचं अफेअर, दोघांच्याही पत्नींना कळलं अन्…
जिनिलीयाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती पूजा करताना दिसत आहे. घरातील देवाऱ्यासमोर ती वडाच्या फांदीला पाणी घालत आहे. तसेच यावेळी तिने पारंपरिक ड्रेस परिधान केला आहे. फोटो शेअर करत जिनिलीया म्हणाली, “वटपौर्णिमा. रितेश देशमुख तू माझ्याबरोबर कायम असणार”. जिनिलीयाने फोटो शेअर करत रितेशवरंच प्रेम व्यक्त केलं आहे.
आपली पत्नी पूजा करत आहे हे पाहून रितेशलाही अगदी आनंद झाला. त्याने जिनिलीयाचा वडाच्या फांदीची पूजा करताना फोटो इन्स्टाग्रामद्वारे शेअर केला. हा फोटो शेअर करत त्यानेही जिनिलीयावरचं प्रेम व्यक्त केलं. तो म्हणाला, “लव्ह यु बायको”. अनेक फोटो व व्हिडीओंमधूनच रितेश व जिनिलीयाचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे दिसून येतं.
मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.