जिनिलीया देशमुख व तिचा भाऊ निगेल डिसूझा यांचं एकमेकांबरोबर खूप घट्टं नातं असून दोघेही अनेकदा एकमेकांसाठी पोस्ट शेअर करत प्रेम व्यक्त करत असतात. आज भावाच्या वाढदिवसानिमित्त जिनिलीयाने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केलीये.
जिनिलीयाने यावेळी तिच्या कुटुंबाबरोबरचे खास फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत. जिनिलीयाने शेअर केलेल्या या फोटोंमधून तिचे आई-वडील,नवरा रितेश देशमुख, मुलं, तिची वहिनी यांचे एकत्रित फोटो पाहायला मिळत आहेत. भावाच्या वाढदिवसानिमित्त तिने त्याचं कौतुक करत या पोस्टला मोठी कॅप्शन दिली आहे.
जिनिलीयाची भावासाठी खास पोस्ट
जिनिलीये या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमधून म्हटलं की, “जगातील सर्वात उत्कृष्ट भाऊ. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे निगू-पिगू. मला खरंच असं वाटतं की मी खूप भाग्यशाली आहे की तू माझा भाऊ आहेस. मला नेहमी असं वाटतं की तू असा व्यक्ती आहेस जो कायम त्याच्या माणसांसाठी, मित्रांसाठी आणि कुटुंबासाठी ठामपणे उभा असेल. मी तुला वचन देते की मी कायम तुझ्यासाठी तुझ्याबरोबर असेन तेव्हासुद्धा जेव्हा तुला माझी गरज नसेल.”
जिनिलीयाने यावेळी पाच पोटो शेअर केले आहेत. एका फोटोत त्यांच्या डिसूझा कुटुंबातील सर्व पुरूष ज्यामध्ये तिचे वडील, भाऊ आणि त्याच्या मलाबरोबर रितेश आणि त्यांची दोन्ही मुलंसुद्धा पाहायला मिळत आहेत. तर एका फोटो तिचे-वडील आणि दोघे भाऊ बहीण असल्याचं दिसतं. यावेळी तिने तिच्या वहिनीचा आणि भावाचा खास फोटोही पोस्ट केला आहे.

जिनिलीया अनेकदा तिच्या कुटुंबीयांबरोबरचे फोटो पोस्ट करत असते. अनेकदा ती सणवारांच्या दिवशी देशमुख कुटुंब तसेच डिसूझा कुटुंबाबरोबरचे फोटो पोस्ट करत असते. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रीय असते आणि त्यामार्फत तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी शेअर करत असते. तिथेही जिनिलीयाचा मोठा चाहतावर्ग आहे.
