scorecardresearch

Premium

“माझ्या प्रिय बाळा!”, मुलांच्या जेवणाच्या डब्यासह जिनिलीया देशमुखने ठेवलं गोड पत्र; म्हणाली, “कामानिमित्त बाहेर…”

“गुलाबाचं फूल अन् जेवणाच्या डब्यासह गोड पत्र…”, जिनिलीया देशमुखने शेअर केलेला फोटो चर्चेत

genelia deshmukh send cute notes for her sons
जिनिलीया देशमुखने लाडक्या मुलांसाठी लिहिलं गोड पत्र

अभिनेत्री जिनिलीया देशमुख आणि अभिनेता रितेश देशमुख यांची जोडी बॉलीवूडसह मराठी मनोरंजनसृष्टीत प्रचंड लोकप्रिय आहे. जवळपास ८ वर्ष एकमेकांना डेट केल्यावर दोघांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. रितेशबरोबर लग्नगाठ बांधल्यानंतर जिनिलीयाने करिअरमधून ब्रेक घेतला होता. दोन मुलं झाल्यानंतर जिनिलीयाने पुन्हा ‘वेड’ चित्रपटाच्या निमित्ताने तिच्या नव्या इनिंगला सुरुवात केली.

हेही वाचा : Video : प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसवर हास्यजत्रेच्या कलाकारांची धमाल! व्हिडीओ शेअर करत वनिता खरात म्हणाली, “पार्टी करायला…”

genelia deshmukh gets surrounded with little kids on the street
Video : जिनिलीया त्यांच्याजवळ गेली अन्…; देशमुखांच्या सुनेच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष, सर्वत्र होतंय कौतुक
shivang chopra post for sister parineeti chopra and raghav chadha wedding
“या देखण्या तरुणाच्या शेजारी तू…”, परिणीची चोप्राच्या भावाची बहिणीच्या लग्नानिमित्त खास पोस्ट, कॅप्शनने वेधलं लक्ष
Parineeti Chopra and Raghav Chadha
परिणीती चोप्रा व राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात; ‘अशी’ आहे विधी आणि कार्यक्रमाची वेळ
usha nadkarni sushant singh rajput
“कितीही पैसे दाबून…”, सुशांतच्या आत्महत्येवर उषा नाडकर्णींची भावूक प्रतिक्रिया, म्हणाल्या “देव योग्य वेळी…”

जिनिलीया आणि रितेशला रियान आणि राहील अशी दोन मुलं आहेत. अभिनय क्षेत्रात पुनरागमन केल्याने अनेकदा तिला मुलांसाठी वेळ मिळत नाही. अशावेळी जिनिलीया त्यांच्या शाळेच्या जेवणाच्या डब्यात खास पत्र लिहून ठेवते. या पत्रात नेमकं ती काय लिहिते? पाहूयात…

हेही वाचा : आई-वडील एकत्र राहत असूनही भूषण प्रधान ‘भूषण सीमा प्रधान’ नाव का लिहितो? अभिनेत्याने दिलेल्या उत्तराने वेधलं लक्ष

अभिनेत्री या पत्रात लिहिते, “माझ्या प्रिय बाळा! मला तुझी खूप आठवण येते आहे. नेहमी लक्षात ठेव… कायम दयाळू वृत्ती ठेवं आणि कणखर राहा…आय लव्ह यू, तुझीच आई” ही छोटीशी पत्र जिनिलीयाने दोन्ही मुलांच्या जेवणाच्या डब्यासह जोडली आहेत आणि बरोबर एक छानसं गुलाबाचं फूल ठेवलं आहे. दोन्ही मुलांच्या पत्रात सारखाच संदेश लिहिला आहे. हा फोटो अभिनेत्रीने नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा : “मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार…” ‘रंग माझा वेगळा’ फेम रेश्मा शिंदेची भावुक पोस्ट; म्हणाली, “पुन्हा नव्या रुपात…”

“कामानिमित्त बाहेर असल्यावर मला माझ्या मुलांना वेळ देता येत नाही. अशावेळी मनात अपराधी भावना असते. त्यामुळे मी माझ्या मुलांच्या डब्यात अशी लहानशी पत्र ठेवते. जेणेकरून दोघंही आनंदी होतील.” असं कॅप्शन जिनिलीयाने या फोटोला दिलं आहे. दरम्यान, रितेश-जिनिलीयाच्या मुलांचं मीडियामध्ये नेहमीच कौतुक होत असतं. दोघेही मुलांबरोबरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Genelia deshmukh send cute notes for her sons with their school tiffin box actress shared photo sva 00

First published on: 04-09-2023 at 16:39 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×