Genelia Deshmukh : गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आज संपूर्ण देशभरात आनंदाचं वातावरण आहे. आता पुढचे दहा दिवस मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात केला जाईल. घराघरांत लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही जिनिलीया व रितेश देशमुखने मोठ्या उत्साहात बाप्पाचं स्वागत केलं आहे. देशमुखांच्या घरच्या गणेशोत्सवाची खास झलक जिनिलीयाने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

रितेश-जिनिलीयाकडे ( Genelia Deshmukh ) मनोरंजन विश्वातील आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. दोघंही परंपरेनुसार नेहमीच आपले मराठी सण मोठ्या आनंदाने साजरे करत असतात. रितेश-जिनिलीयाप्रमाणे त्यांच्या मुलांच्या संस्काराचं सुद्धा नेहमी कौतुक केलं जातं. गेल्यावर्षी रियान आणि राहिल यांनी वडिलांच्या मदतीने इकोफ्रेंडली गणेशमूर्ती साकारली होती. यंदा या दोघांनी आपल्या भावंडांच्या साथीने बाप्पाची पूजा केली आहे.

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
riteish deshmukh out india for shooting genelia shared beautiful video
Bigg Boss मध्ये गैरहजर राहणाऱ्या रितेश देशमुखचा परदेशातील व्हिडीओ आला समोर! जिनिलीया म्हणते, “बाबाला २० दिवसांनी…”
govinda fan styed at his home as maid
“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”
navra maza navsacha 2 marathi actor Dhruva datar honest review
“चित्रपट खरंच खूप वाईट आहे” ‘नवरा माझा नवसाचा २’बद्दल मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत; म्हणाला, “सॉरी पण उगाच कौतुक…”
Hungama 2 actress Pranitha Subhash blessed with baby boy
बॉलीवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, तीन वर्षांपूर्वी बिझनेसमनशी केलंय लग्न
Leeza Bindra slams nikki tamboli bigg boss marathi 5
“रितेश सरांनी त्या मुलीला…”, अरबाज पटेलची गर्लफ्रेंड निक्कीबद्दल स्पष्टच बोलली; म्हणाली, “मी तुला कधीच…”

हेही वाचा : Video : जंगलाचा देखावा, विविध प्राणी अन् हाताने घडवली बाप्पाची सुंदर मूर्ती; मराठी अभिनेत्रीच्या कौशल्याचं होतंय कौतुक

देशमुखांनी एकत्र साजरा केला गणेशोत्सव

‘बिग बॉस मराठी’च्या होस्टिंगची जबाबदारी असल्याने सध्या रितेशचं वेळापत्रक खूपच व्यग्र असतं. परंतु, या सगळ्यात वेळात वेळ काढून अभिनेत्याने गणपतीचा सण आपल्या कुटुंबीयांबरोबर साजरा करण्यास प्राधान्य दिलं आहे. गणेशोत्सवासाठी संपूर्ण देशमुख कुटुंब एकत्र जमल्याचं जिनिलीयाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

देशमुख कुटुंब खास गणेशोत्सवासाठी एकत्र आलं होतं. रितेश-जिनिलीया त्यांची मुलं रियान-राहिल तसेच रितेशचे मोठे बंधू अमित देशमुख, त्यांच्या पत्नी अदिती आणि त्यांची दोन मुलं अवीर व अवान याशिवाय अभिनेत्याचे लहान भाऊ धिरज देशमुख, त्यांची पत्नी दीपिशिखा व दोन मुलं वंश आणि दिवियाना असे सगळे जण गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी एकत्र आले होते. देशमुख कुटुंबातील सगळ्या लहान मुलांनी एकत्र मिळून यावेळी बाप्पाची आरती केली.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – “निक्की ही आहे तुमची जागा”, रितेशने चांगलंच झापलं; भाऊच्या धक्क्यावरून उठवलं अन् थेट…; ‘त्या’ वक्तव्यावरून मोठा वाद

हेही वाचा : ठरलं तर मग : प्रियाचा डाव फसला! पूर्णा आजीचा ‘तो’ निर्णय अन् प्रतिमा-रविराजसह सायलीने केली बाप्पाची पूजा, पाहा प्रोमो

जिनिलीयाने ( Genelia Deshmukh ) हा सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये सगळ्यांनीच बाप्पाची मनोभावे पूजा केल्याचं पाहायला मिळतंय. याशिवाय महाराष्ट्राच्या लाडक्या दादा-वहिनींनी आज सणानिमित्त पारंपरिक लूक केल्याचं या व्हिडीओमधून स्पष्ट होत आहे. दरम्यान, संपूर्ण देशमुख कुटुंबीयांवर हा व्हिडीओ पाहून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

रितेश-जिनिलीयाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचं होस्टिंग करत आहे. तर, जिनिलीया ( Genelia Deshmukh ) लवकरच आमिर खानच्या चित्रपटात झळकणार आहे.