Genelia Deshmukh Birthday Wish Post For Son : रितेश व जिनिलीया देशमुख यांची जोडी मराठीसह हिंदी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. चाहते त्यांच्याकडे मनोरंजन विश्वातील आदर्श जोडपं म्हणून पाहतात. सोशल मीडियावर दोघंही कायम सक्रिय असतात. रितेश-जिनिलीया त्यांचे फोटो, कुटुंबीयांचे मजेशीर व्हिडीओ, डान्स व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. आज जिनिलीयाने तिच्या आयुष्यातील एका खास व्यक्तीसाठी पोस्ट शेअर केली आहे. ती व्यक्ती म्हणजे तिचा धाकटा मुलगा राहील. आज ( १ जून ) रितेश- जिनिलीयाचा धाकटा मुलगा राहीलचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जिनिलीयाने खास पोस्ट लिहिली आहे.

राहीलचा जन्म २०१६ मध्ये झाला. आज त्याचा नववा वाढदिवस आहे, यानिमित्ताने जिनिलीयाने खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राहीलला फुटबॉलची प्रचंड आवड आहे…त्यामुळे वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने राहीलचे फुटबॉल जर्सीतील फोटो शेअर केले आहेत.

जिनिलीया लिहिते, “My Dearest राहील, तुझ्यामुळे आयुष्यात मी खूप जास्त खंबीर झाले. पण, राहील तूच माझ्या मृदू अन् शांत स्वभावाचंही कारण आहेस. अनेकदा तू माझ्या संयमाची परीक्षा घेतोस, गोंधळ घालतोस…आणि दुसऱ्या क्षणाला तुझे छोटे हात माझ्या गळ्याभोवती गुंडाळले जातात…जणू मीच तुझं संपूर्ण जग आहे. राहील तुझं प्रेम खूप मोठं आहे… कायम अशीच प्रेमाने मला घट्ट मिठी मारत जा… तुझं हास्य आमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सार्थकी लावतं. वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या बाळा…तू माझ्यासाठी सर्वात जास्त खास आहेत…नेहमीच सर्वांची काळजी घेत राहा…कधीच तुझा स्वभाव बदलू नकोस.”

जिनिलीयाच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी राहीलच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. “रितेश सर आणि जिनिलीया मॅमनी दोन्ही मुलांवर खूप चांगले संस्कार केले आहेत”, “जिनिलीयाने दोन्ही मुलांचं खूप चांगलं संगोपन केलंय… अभिनेत्री असूनही आई म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत” अशा कमेंट्स अभिनेत्रीच्या पोस्टवर आल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जिनिलीया देशमुखच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर आता लवकरच ती आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमा सर्वत्र २० जूनला प्रदर्शित होणार आहे.