काही दिवसांपासून बॉलीवूड अभिनेता गोविंदा (Govinda) यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक घटना घडताना दिसत आहेत. गेल्या वर्षी त्यांना गोळी लागल्याची बातमी समोर आली होती. तसेच काही दिवसांपासून त्याच्या घटस्फोटाच्या चर्चा होताना दिसत आहेत. अशातच आता अभिनेत्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाले असून, त्यामुळे गोविंदा खचून गेला आहे. शुक्रवारी (६ मार्च) अभिनेत्याचे पूर्व सचिव शशी प्रभू (Shashi Prabhu) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने अभिनेत्याला खूप मोठा धक्का बसला आहे. शशी प्रभू हे केवळ गोविंदा यांचे सचिव नव्हते, तर ते त्यांचे जवळचे मित्रदेखील होते. गोविंदा यांच्या संपूर्ण कारकिर्दीत शशी प्रभू यांची महत्त्वाची भूमिका होती, असे म्हटले जाते.
शशी प्रभूंच्या निधनाने गोविंदावर दु:खाचा डोंगर
काही दिवसांपूर्वी शशी प्रभू (Shashi Prabhu) यांनी गोविंदा (Govinda) व सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान त्यांचा बचाव केला होता. घटस्फोटाच्या बातम्या निराधार असल्याचे त्यांनी म्हटले होते. अशातच आता शशी प्रभू यांच्या अचानक निघून जाण्याने गोविंदावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. १९८६ मध्ये गोविंदाचा ‘इल्जाम’ चित्रपट प्रदर्शित झाला होता, तेव्हापासून शशी प्रभू (Shashi Prabhu) त्याच्याबरोबर होते. शशी यांचे केवळ गोविंदाशीच नाही, तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाशीही खूप चांगले संबंध होते. त्यामुळे शशी यांच्या अंत्यदर्शनाला गोविंदाने विशेष उपस्थिती दर्शवली.
शशी प्रभूंच्या अंत्यदर्शनाला गोविंदा भावुक
शशी प्रभू (Shashi Prabhu) यांच्या निधनाचे वृत्त कळताच गोविंदा (Govinda) त्यांच्या बोरिवली येथील घरी पोहोचले. शशी प्रभू यांच्या अंत्यदर्शनाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्याला अतीव दु:ख झाल्याचे दिसत आहे. तसेच अभिनेता आपल्या सहकाऱ्याच्या आठवणीत अश्रू ढाळताना दिसत आहे. हा भावूक व्हिडीओ पाहून गोविंदा व शशी प्रभू (Shashi Prabhu) यांचे नाते किती खास होते, याबद्दलच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. तसेच अनेकांनी शशी प्रभू यांना श्रद्धांजलीदेखील वाहिली आहे.
शशी प्रभू कोण होते?
दरम्यान, गोविंदा (Govinda) यांनी बॉलीवूडमध्ये अभिनय करायला सुरुवात केल्यापासून गोविंदा आणि शशी प्रभू (Shashi Prabhu) एकत्र काम करीत आहेत. सुरुवातीपासूनच त्यांचे खूप घनिष्ठ नाते होते. त्यांनी अनेक वर्षे गोविंदासाठी काम केले. सुरुवातीच्या संघर्षमय काळात त्यांनी गोविंदा यांना खंबीर साथ दिली होती. गोविंदाचेही त्यांच्यावर भावासारखे प्रेम होते आणि अजूनही त्यांचे हे नाते तसेच होते.